कोल्हापूर / प्रतिनिधी
सचिन टीम टॉपर्स रोलर स्केटिंग अकॅडमी आणि संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल रंकाळा यांच्या वतीने दिनांक ६ मे रोजी रोजी लोकराजा छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता सोहळ्या निमीत्त सायंकाळी सहा ते सात सलग एक तास स्केटींग करून सचिन टीम टाॅपर्स च्या स्केटरनी आदरांजली वाहिली.
याउपक्रमा मध्ये विश्वविक्रमवीर भारतभूषण डॉ. केदार विजय साळूंखे यांने शाहू महाराज यांचे वेशभूषेमध्ये सलग एक तास स्केटींग केले.
लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मेघराज खराडे, संजीवनी शिक्षण समूहाचे अध्यक्ष अमर सरनाईक, शिवतेज खराडे, पोलीस उपअधिक्षक स्वाती गायकवाड , यांचे हस्ते पूजन करून उपक्रमाची सुरवात केली.
या उपक्रमामध्ये मुडशिंगी स्केटींग ॲकॅडमी, तिळवणी स्केटींग ॲकॅडमी व सचिन टीम टाॅपर्सची ९५मुले सहभागी झाली होती. सर्व सहभागी मुलांना जितेंद्र यशवंत यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सदरचा उपक्रम हा सचिन टॉपर्स सचिन इंगवले यांच्या मार्गदर्शना खाली प्रशिक्षक शिवाजी मोरे ,गोरख कोळी, शुभांगी कांबळे यांनी पार पाडला. या उपक्रमास सर्व पालकाचे सहकार्य लाभले
फोटो
याउपक्रमा मध्ये विश्वविक्रमवीर भारतभूषण डॉ. केदार विजय साळूंखे यांने शाहू महाराज यांचे वेशभूषेमध्ये सलग एक तास स्केटींग करतांना.