कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील *मुरगूड हायस्कूल व ज्युनि कॉलेज मुरगूड* या विद्यालयामध्ये आय.आय.बी.एम. संस्था चिखली, पुणे यांनी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेअंतर्गत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विद्यालयास ज्ञानसमृद्धी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदरचा पुरस्कार स्विकारताना प्राचार्य श्री एस आर पाटील ,उपप्राचार्य श्री एस पी पाटील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते... *आय.आय.बी.एम. कॉलेजचे प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ* यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच विद्यालयामध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर आय.आय बी एम कॉलेजचे प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ, प्रेरणा कनावजे, संकेत रोडे, स्नेहल पाटील तसेच प्राचार्य श्री एस आर पाटील उपप्राचार्य श्री एस पी पाटील शिक्षकवर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मनोगतातून आय आय बी एम कॉलेजच्या *प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ* यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासावर कसे करीयर घडवता येते, उच्च पदावर कसे पोहचावे तसेच विद्यार्थिनींनी आपल्या पायावर खंबीरपणे कसे उभे राहावे याविषयी व मॅनेजमेंटच्या शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले.
प्राचार्य श्री एस आर पाटील यांनी विद्यालयात राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व विद्यालयास मिळालेल्या पुरस्काराबद्दल विद्यार्थी विद्यालय व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच हा पुरस्कार माझा नसून तो संस्थेचा, माझ्या सर्व सहकारी शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा आहे असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन श्री एम बी टेपूगडे यांनी केले, कार्यक्रमाचे *प्रास्ताविक उपप्राचार्य श्री एस पी पाटील यांनी केले, तर आभार श्री ए एन पाटील यांनी मानले.