पेठवडगांव / प्रतिनिधी
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व-2022 निमित्त बुधवारदि.११ मे रोजी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत १४संघामध्ये वडगाव विद्यालय (ज्युनि. कॉलेज / तंत्र शाखा) पेठवडगाव या विद्यालयाच्या कु. आर्या गुरव, कु. श्रध्दा पाटील व कु. प्राची पोवार यांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.
श्री शाहू मिल राजारामपुरी कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के , नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात , आरबीआयच्या माजी डे. डायरेक्टर डॉ. उषा थोरात, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले.
या यशस्वी विद्यार्थींना विद्यालयाचे प्राचार्य आर. आर. पाटील उपमुख्याध्यापक एस. डी. माने , पर्यवेक्षक डी. के. पाटील , परीक्षा विभाग प्रमुख डी. ए. शेळके , तंत्रविभाग प्रमुख ए. एस. आंबी , कार्यालयीन प्रमुख के. बी. वाघमोडे या सर्वांची प्रेरणा मिळाली. या विद्यार्थीनींनी
डी.एस. कुंभार,सौ एस. एस. चव्हाण , ए. ए.पन्हाळकर, अजित लाड, संदीप नायकवडी , रवि वासुदेव सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशस्वी विद्यार्थीनींचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
फोटो
पेठ वडगांव : वडगांव विद्यालय वडगाव मधील जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थीनींनी कु.आर्या गुरव कु.श्रद्धा पाटील कु. प्राची पोवार समवेत प्राचार्य आर.आर.पाटील व मार्गदर्शक शिक्षक वृंद