मौजे वडगाव / प्रतिनिधी
अमर थोरवत
मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरोबा देवालयाच्या शिखर बांधकामाचा शुभारंभ श्री संत बाळूमामा संतुबाई देवालय रूकडी माणगाव चे प. पू. देबाजे मामा हेरवाडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
समस्त धनगर समाज तसेच गावातील दानशूर व्यक्तींच्या लोकवर्गणीतून बिरोबा देवालयाच्या शिखराचे बांधकाम करणार असून समाजातील दानशूर व्यक्तींनी या शिखर बांधकामासाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले. गुरुवारी या शिखर बांधकाम कामाचा शुभारंभ करून दही भात, आंबील, घुगऱ्या, केळी, सुहासिनी, मंदिरातील पुजारी, तसेच महालिंग जंगम यांच्या मंत्र उच्चाराने " "बिरोबाच्या नावानं चांगभलं'' "काशी लिंगाच्या नावानं चांगभलं "च्या गजरात या विधीचे शास्त्रोक्त पूजन करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी देबाजे मामा हेरवाडकर, डॉ. विजय गोरड महालिंग जंगम, रघुनाथ गोरड ,बाळासो थोरवत, बाबासो लांडगे, समाधान भेंडेकर, हिंदुराव गोरड, बाबासो थोरवत ,अभिजीत थोरवत, अनिल भेंडेकर, आनंदा गोरड, संदीप गोरड, संतोष शेंडगे, गणपती भेंडेकर, बापू शेंडगे ,सुनील खारेपाटणे, सुरेश कांबरे, यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.
फोटो
बिरोबा देवालयाच्या शिखर बांधकामाचा शुभारंभ करताना देबाजे मामा हेरवाडकर, महालिंग जंगम, बाळासो थोरवत, रघुनाथ गोरड ,बाबासो लांडगे ,व इतर मान्यवर.