हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील श्रीदत्त विविध कार्यकारी सहकारी विकास संस्था मर्यादित मौजे वडगाव या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. केडीसी बँकेचे संचालक व माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली १३ जागेसाठी सत्ताधारी गटाला १० तर विरोधी गटाला ३ जागा देण्यात आल्या .सत्ताधारी गटातून ४ विद्यमान संचालकांना संधी देण्यात आली .तर ९ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे: सर्वसाधारण कर्जदार गटातून अॅड. विजय चौगुले, विलास सावंत, शिवाजी जाधव, मधुकर आकिवाटे, दिपक थोरवत, रामचंद्र चौगुले, जमीर पटेल ,बापू शेटे, महिला राखीव मधून: नीता वाकरेकर ,दिपा सावंत, इतर मागास प्रवर्गातून: महालिंग जंगम, अनुसूचित जातीमधून प्रकाश कांबळे ,भटक्या जाती जमाती मधून : अंबाजी कोळेकर, असे उमेदवार बिनविरोध निवडून आले .
केडीसी बँकेचे संचालक माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची निवडणूक बिनविरोध करणेकामी सत्ताधारी गटाकडून रावसो चौगुले ,माजी सरपंच सतीशकुमार चौगुले, शिवसेनेचे सुरेश कांबरे, अॅड. विजय चौगुले, सामाजिक कार्यकर्ते सुनील खारेपाटणे, सतीश वाकरेकर, अविनाश पाटील ,आनंदा थोरवत, महादेव शिंदे, अमोल झांबरे, स्वप्नील चौगुले, तर विरोधी गटाकडून श्रीकांत सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक सहकारी संस्था हातकलंगलेच्या डॉ. सौ. प्रगती बागल यांनी काम पाहिले. त्यांना सचिव पोपट बेडेकर यांनी सहकार्य केले. यावेळी नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले.