हेरले / प्रतिनिधी
विश्वविक्रमवीर स्केटर व सायकलिस्ट भारतभूषण डॉक्टर केदार विजय साळूंखे यास सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय नवी दिल्ली व नेहरु युवा केंद्र संघटन पुरस्कृत अटल भारत स्पोर्ट्स ॲण्ड कल्चर असोसिएशन भारत यांचे वतीने देण्यात येणारा अटल नॅशनल युथ अवॉर्ड 2022 हा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते राज्यभवन मुंबई येथे देण्यात आला. तसेच राजभवन कार्यालयात ही डॉ. केदार याचा विशेष सत्कार करण्यात आला.
डाॅ.केदार साळुंखे यांने अवघ्या सातव्या वर्षी सायकलिगमध्ये एकाच बुकमध्ये एका वेळी चार रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला. आतापर्यंत स्केटींग व सायकलिंगमध्ये 18 विश्वविक्रम नोंदवले आहेत.डाॅ. केदार यास वयाच्या सातव्या वर्षी 'डॉक्टरेट इन ॲथलेटिक्स ' ही पदवी देऊन द दायसेस ऑफ अशिया चेन्नई तामिळनाडू सन्मानित केले असून मेजर ध्यानंचद राष्ट्रीय खेळाडू पुरस्कार ही मिळाला आहे.
डाॅ.केदार साळुंखे याला विबग्याेर स्कुल च्या प्राचार्या स्नेहल नावेॅकर, प्रशिक्षक सचिन इगंवले, स्वप्निल काेळी, वडिल विजय साळूंखे व आई स्वाती गायकवाड साळूंखे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.