हेरले /प्रतिनिधी
घर आणि शाळेतील अंतर हे मुलीच्या शिक्षणावर विपरित परिणाम करणारे ठरू नये या उद्देशाने कोल्हापूर येथील दानशूर व्यकतीमत्व व हॉटेल २४ K चे मालक राजेश करंदीकर मोहन पाटील संदीप सोनवलकर यांनी सायकल भेट दिली .
नागाव (ता. हातकणंगले) येथील सुजाता कुंभार ही मुलगी आपल्या शेतमजूरआई वडिलांसह गावाबाहेर , शेतात राहतात . तीने दहावीचे पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून कोल्हापूर येथे महाविद्यालयात प्रवेश घेतला . पण तीला शेतातल्या घरापासून ते के . एम . टी . बस पकडण्यसाठी दररोजसुमारे पाच ते सहा किमी चे अंतर पायपीट करित जावे लागत होते. त्यामुळे तीचा वेळ वाया जाऊ नये व शिक्षणावर परिणाम होऊ नये तसेच तीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने तीला सायकल भेट देण्यात आली.
यावेळी माजी सरपच सतिश कुमार चौगुले , जयवंत चौगुले (अतिग्रे ), बाळासो थोरवत , माजी उपसरपंच सुरेश कांबरे , अविनाश पाटील ,गंगाराम कुंभार , ओंकार चौगुले , विनोद सौदे ' शुभम घुगरे , यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .
आई वडील शेतमजूर असल्याने सायकल घेण्याची सुद्धा माझी परिस्थीती नव्हती दररोज पाच ते सहा किमी पायपीट करित मी के एमटी पर्यत पोहचत असे. आशा अडचणीच्या काळात मला सायकल दिल्याने माझा वेळ व शिक्षणाची चागली सोय झाली .
सुजाता कुंभार ( विद्यार्थीनी
)
फोटो
हॉटेल २४ K चे मालक राजेश करंदीकर यांनी आपला मित्रांच्या व मान्यवराच्या हस्ते सायकल भेट दिली .