शिरोली प्रतिनिधी
गावातील तंटे गावातच मिटावेत त्यातून जनतेचे आर्थिक नुकसान टळावे याकरीता महाराष्ट्र शासनाच्या प्रेरणेतून महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निर्मिती झाली.या समितीच्या अध्यक्षपदी राजू पाटील या योग्य व्यक्तीची निवड झालेने ते या पदाचे माध्यमातून जनतेला नक्कीच न्याय देतील असा विश्वास शिरोली लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे यांनी व्यक्त केला.
शिरोली ग्रामपंचायतच्या वतीने तंटामुक्त अध्यक्षपदी राजू पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे जिल्हाध्यक्ष एस डी लाड होते.
यावेळी उर्मिलाताई जाधव, कृष्णात पाटील, ग्राम वि. अधिकारी व्ही .बी. भोगण यांची भाषणे झाली . स्वागत प्रकाश कौंदाडे यांनी केले. सूत्रसंचालन बाबासो कांबळे,अविनाश कोळी यांनी केले. प्रस्ताविक सलीम महात, विनायक कुंभार यांनी केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या पुष्पा पाटील, संध्याराणी कुरणे, श्वेता गुरव, मीनाक्षी खटाळे, न्यामतभी मुल्ला ,अनिता कांबळे उपस्थित होत्या. आभार उपसरपंच सुरेशराव यादव यांनी मानले.
फोटो
शिरोलीच्या तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजू पाटील यांचा लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे व उपसरपंच सुरेशराव यादव यांच्या हस्ते सत्कार