हेरले / प्रतिनिधी
हेरले येथे वर्षावास निमित्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण बौद्ध समन्वय समितीच्या माध्यमातून श्रुंखलाबद्ध धम्म प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
रविवारी दि. ११सप्टेंबर २०२२ रोजी धम्म प्रवचन मालिकेतील ९ वे पुष्प कार्यक्रम संपन्न झाला
धम्म चळवळ कृतिशील उपक्रमाने गतिमान होईल यावर विश्वास ठेऊन, वर्षावास निमित्ताने गावनिहाय धम्म प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये किमान १०० गावांचे उद्दिष्ट ठेवले आहे. आपण धम्म चळवळीतील प्रचारक, अभ्यासक, उपासक, उपासिका, कार्यकर्ता म्हणून या उपक्रमामध्ये सहभागी होऊन कोल्हापूर जिल्ह्यातील धम्मकार्य वाढीसाठी प्रयत्न सुरू आहे. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती- श्रीमती जयश्री कुरणे व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती. उर्मिला कुरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास प्रवचनकार आयु. कुलदीप जोगडे सर, यांनी धम्मदेसना देण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावना संदीप कोले यांनी केली व आभार हातकणंगले पंचायत समिती माजी सभापती- श्रीमती जयश्री कुरणे यांनी केले. त्यावेळी अक्षय कटकोळे , निखिल कुरणे, उर्मिला कुरणे, कृष्णात कटकोळे, नागावकर सर, सुरेश कदम ,प्रभुदास खाबडे, सुनील कुरणे, रवी लोकरे, मच्छिंद्र लोकरे, देवदान कांबळे, अमोल खाबडे, सतीश भोसले, राहुल कटकोळे,व बौद्ध बांधव उपस्थित होते.