हेरले / प्रतिनिधी
लम्पी स्किन या आजाराची लागण झालेल्या अतिग्रे गावातील शेतकऱ्यांच्या गोठ्यास कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक गोकुळ संघाचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी भेट दिली. यावेळी गोकुळ दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या आयुर्वेदिक औषधाचे वाटप डोंगळे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
हा आजाराची सुरुवात राजस्थान राज्यातून झाली आहे. हा संसर्गजन्य आजार असुन जनावरांचे आरोग्य धोक्यात येवू शकते व दूध उत्पादनात घट होते. या आजाराची भिती बाळगण्याची गरज नाही. हा आजार योग्य उपचार केल्यास बरा होतो.असे सांगून गोकुळ दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत योग्य ती काळजी घेतली जाईल असे आश्वासन डोंगळे यांनी दूध उत्पादक शेतक-यांना दिले.
यावेळी डॉ. मगरे व संतुलित आहार कार्यक्रमाचे प्रतिनिधी मुबारक हजारी उपस्थित होते.
फोटो......
अतिग्रे येथील आजारी जनावरांच्या गोठ्यास भेटी प्रसंगी माहिती घेताना अरुण डोंगळे, डॉ. मगरे व मुबारक हजारी.