हेरले / प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले ) येथील श्री छत्रपती शिवाजी विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेची २७ वी सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत संपन्न झाली. संस्थेचे सचिव नंदकुमार माने यांनी अहवाल वाचन केले तर सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन उदय चौगुले होते .
यावेळी बोलताना चेअरमन उदय चौगुले म्हणाले,गेली काही वर्षांमध्ये संस्थेमध्ये अत्यंत काटकसरीने कारभार केला असल्याने ठेवी व कर्जामध्ये वाढ झाली असल्यामुळे संस्थेस ४ लाख ३ हजार इतका नफा झाला आहे. या प्रसंगी सभासदांना ५% डिव्हिडंट देण्याचे जाहीर करत,मयत सभासदाला अंत्यविधीसाठी तीन हजार रुपयांची तरतूद केल्याचे जाहीर केले. या प्रसंगी माजी सभापती राजेश पाटील, माजी उपसभापती अशोक मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना सरचिटणीस मुनिर जमादार,सुरेश चौगुले यांनी मनोगते व्यक्त केली.
या सभेस चेअरमन उदय चौगुले, व्हा .चेअरमन कपील भोसले, संचालक माजी सभापती राजेश पाटील , आदगोंडा पाटील,प्रकाश पाटील,सुनील खोचगे, शशिकांत पाटील , महावीर चौगुले, राजेंद्र कदम,स्वप्नील कोळेकर, अशोक मुंडे,श्रीमती शांतादेवी कोळेकर, श्रीमती रोहिणी पाटील आदी मान्यवरांसह सभासद, संस्थेचे कर्मचारी, हितचिंतक मोठया संख्येंनी उपस्थित होते . आभार व्हा. चेअरमन कपिल भोसले यांनी मानले.