कोल्हापूर प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा सीआरसी क्रमांक सात मध्ये शिक्षण परिषद संपन्न झाली त्यामध्ये सीआरसी प्रमुख डॉक्टर अजित कुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले ,ज्येष्ठ तज्ञ कविता पाटील ,आरती नाईक , किशोर शिणगारे यांनी आपल्या विषयासंदर्भात व्याख्या नवोपक्रम ,मूलभूत संख्याज्ञान, माता पालकांचे गट या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकेमध्ये डॉक्टर अजितकुमार पाटील यांनी " विद्यार्थी देशाचे भवितव्य आणि संपत्ती आहेत त्यांचा सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. भारत सरकारच्या निपून भारत प्रकल्पांतर्गत राज्यात पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियानाचे अंमल बजावणी सुरू आहे त्या अंतर्गत इयत्ता पहिलीत येणाऱ्या मुलांसाठी पहिले पाऊल शाळा पूर्व तयारी देखील राबविण्यात येत आहे.
पहिले पाऊल यशस्वी करण्यासाठी व्हिडिओ, कार्डद्वारे आणि विविध उपाय योजना करून माता पालक गटांना मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात येत आहे.
2026 व 27 पर्यंत राज्यातील तीन ते नऊ वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांसाठी निर्धारित शिक्षण लक्ष पूर्ण करतील व इयत्ता पाचवी पर्यंत कोणते मूल शैक्षणिक प्रवाहात मागे राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे या संदर्भात मार्गदर्शन केले
शिक्षण परिषदेसाठी प्रमुख गोरख वातकर, टी आर पाटील, प्रदीप जानकर ,उत्तम कुंभार, मुख्याध्यापिका छाया हिरगुडे, सुनिता कांबळे, विमल जाधव, विजय कुरणे, सरदार पाटील ,दत्तात्रय डांगरे इत्यादी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते आभार अनिल सरकसर यांनी मानले.निपुण भारत प्रतिज्ञा जोतिबा बामणे यांनी दिली.