हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगाव ते कोल्हापूर के . एम . टी . बस सेवा काही दिवसापासून खंडित झाली असून ती पुर्ववत सुरु करावी अशी मागणी जि.प . च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या शिफारस पत्राद्वारे गावातील पदाधिकाऱ्याच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर महानगरपालिकाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.
मागील काही दिवसा पासून कोरोणाच्या कारणास्तव व कमी उत्पन्न मिळत आसल्याचे कारण देत मौजे वडगावात येणाऱ्या बसच्या सर्व फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत . कोल्हापूर हून संध्याकाळी मौजे वडगावात मुक्कामी येणारी बस सकाळी ६ वा ४५ मी ,
९ .०० वा, १२ . ०० वा , ४ ०० वा .
६ . ० ० वा , यावेळेत ये - जा करित होती . हि बससेवा विध्यार्थांना अतिशय उपयुक्त ठरत होती . कारण सकाळी व दिवसभर भरणाऱ्या शाळेच्या तसेच शासकीय कामासाठी ये - जा करणाऱ्या नागरिकाना सोयीस्कर होती . परंतू कोरोणा काळात बंद झालेली बससेवा कोरोणानंतर उत्पन्न कमी मिळत आहे म्हणून बंद करण्यात आली आहे . त्यामुळे विध्यार्थांची गैरसोय होऊ लागली असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे . गावापासून फाट्यापर्यंत ये - जा हे ६ कि.मी. चेअंतर विध्यार्थांना पायपीट करणे जिकिरीचे झाले आहे . त्यामुळे ही बस सेवा पुर्ववत सुरु करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने गावातील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे
या शिष्टमंडळामध्ये माजी सरपंच सतिश चौगुले , माजी उपसरपंच सुरेश कांबरे ' ग्रा पं . सदस्य अवधूत मुसळे ' अविनाश पाटील , सामाजिक कार्यकर्ते सुनिल खारेपाटणे ' शौमिका महाडिक यांचे स्वीय सहाय्यक युवराज पुजारी , स्वप्नील चौगुले , महादेव चौगुले, अमोल झांबरे ,उपस्थीत होते .
फोटो
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ . कांदबरी बलकवडे यांना पुर्ववत बससेवा सुरु करणे संदर्भात निवेदन देताना शिष्टमंडळ