कसबा बावडा दि : 19 ,
कोल्हापूर शिक्षण समिती महानगरपालिका अंतर्गत मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 मध्ये पी जी आय अंतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद ऑनलाइन कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेचे प्रास्ताविक व माहिती शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांनी सांगितले.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे श्रावण कोकितकर सर यांनी या कार्यशाळेचे महत्त्व सांगितले.प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूरचे प्रशासन अधिकारी एस के यादव साहेब यांनी एकूण या कार्यशाळेत संदर्भात उद्देश सांगितला.या ऑनलाइन कार्यशाळेमध्ये जयश्री सावंत, साताप्पा पाटील मनीषा साळोखे, जयश्री पुजारी, रोहिणी शेवाळे,रोहिणी शिंगे मनीषा शिंदे यांनी तज्ञ मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये आपले पीजीआय संदर्भात ऑनलाइन मिटिंग मध्ये मार्गदर्शन केले.तंत्रस्नेही निखिल पाटील,शिवशंभू गाटे, तमेजा मुजावर यांनी काम पाहिले.
या शिक्षण परिषदेमध्ये शगुन पोर्टल, नॅशनल अचीवमेंट सर्वे, शाळासिद्धी,मध्यान भोजन,गुणवत्ता विकास कार्यक्रम,गणित पेटी विज्ञान पेटी,फिट इंडिया, विज्ञान प्रयोग शाळा विद्यार्थ्यांच्या स्वसंरक्षणाचे धडे, आपत्ती व्यवस्थापन डिजिटल लॅब, शाळेच्या भौतिक सुविधा,विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळ तसेच शाळेच्या पायाभूत सुविधा,वर्ग आंतरक्रिया, प्रवेश निष्पत्ती मानके, कार्यक्षेत्रे तसेच एकूण या कोरोनाकाळामध्ये चाललेल्या कामाची प्रक्रिया कशा प्रकारची असावी यासंदर्भात 11 ते 1 या वेळेमध्ये ऑनलाइन नेटवर केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली.
या परिषदेसाठी प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनअधिकारी एस के यादवसाहेब शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळीसाहेब ,बाळासाहेब कांबळेसाहेब,उषा सरदेसाई व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे श्रावण कोकितकर,आसमा पठाण यांनी सहकार्य केले या कार्यशाळेमध्ये 32 शाळेचे मुख्याध्यापक व 118 ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये शिक्षक सहभागी झाले होते या सर्वांचे आभार रोहिणी शिंगे मॅडम यांनी मानले.