हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.30/7/21
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कोसळत असलेल्या पावसाच्या निमित्ताने महापूरात हिंदू आणि मुस्लिम
बांधवांमधल्या मूलभूत ऐक्याचा आदर्श वस्तुपाठच समोर उभा राहिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यातील सलग चार दिवस रात्र अतीवृष्टी झाल्यानंतर अख्खं शहर जलमय झाले . त्यामुळे शहरात जाणारी सर्वच वाहने शहराबाहेरच
थांबवण्यात आली होती. त्यामुळे या सरकारी आणि खासगी गाडयामधल्या प्रवाशांची अन्न पाण्याविना मोठी
आडचण झालेली असताना त्यांच्या मदतीला शिरोली गावामधील मुस्लिम बांधव पुढे आले . पुणे, देवगड,
औरंगाबाद, सोलापूर अशा विविध भागातून मोठया संख्येने अलेली वाहन महापूरामुळे पूणे-बंगळूर महामार्ग
बंद झाल्यानंतर शिरोली भागातच थांबवण्यात आली. त्यामुळे सरकारी एस. टी. बसेस आणि राज्याच्या विविध
भागातील १५ हून आधिक बसेस खासगी वाहने थांबवलेली होती . अनेक वाहनांच्या रांगा शिरोली भागातील
महामार्गावर लागल्यामुळे वाहनामध्ये अडकून पडलेल्या या ७ooहून प्रवाशांची तीन दिवस मोफत जेवणाची आणि निवासाची व औषध उपचाराची सोय स्थानिक शिरोली मदरसा मध्ये केली. हाजी अस्लम सय्यद, हाजी इकबाल देसाई, मैनुददीन मुल्ला, हाजी शिकंदर सन्दे, जमीर मुल्ला, महमंद महात, मनजूर देसाई, सलिम महात, नजीर पेंढारी, याकूब मूल्ला, मोहिददन मुल्ला, शकिल्ल किल्लेदार, जूवरे मुल्ला, जहीर इनामदार, मोहसिन देसाई, जुवेर कुरणे,
साहेबलाल देसाई व समस्त मुस्लिम समाज यासर्व मंडळीनी सहाकार्य
केले.
फोटो
शिरोली मदरसा येथे वाहन चालक व प्रवाश्यांना भोजन वाटप करतांना मुस्लिम बांधव.