हेरले / प्रतिनिधी
दि.4/7/21
कोल्हापूर जिल्हा शिक्षेकेतर कर्मचाऱ्याच्या विविध मागण्याचे निवेदन पूणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना देण्यात आले .
या लेखी निवेदनामध्ये प्रामुख्याने राज्यातील सर्व कर्मचाऱ्याना 10:20:30 च्या आश्वासित प्रगत योजनेचा लाभ मिळत असून फक्त शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांना अध्याप लाभ मिळत नाही तो मिळावा, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याची भरतीबंदी उठवून शाळा संहिते प्रमाणे कर्मचारी भरती सुरु करावी, अतिरिक्त वरिष्ठ लिपिकांना वेतनश्रेणीस संरक्षण देवून निवृत्तीपर्यंत तेथेच सेवेची संधी द्यावी,नवीन मंजूर शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांना शालार्थ आय.डी .नंबर द्यावेत या मागण्याचे निवेदन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना देणेत आले.या मागण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचे समवेत सर्वअधिकाऱ्या समवेत बैठक लावण्याचे आश्वासन आमदार जयंत आसगावकर यांनी दिले .
यावेळी शाळा कृती समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील शिक्षेकेत्तर संघटनेचे प्रदेश ऑडिटर संजय पाटील,सचिव चंद्रकांत लाड, अविनाश ढोणे, सुरेश कारदगे, उदय पाटील, के. के.पाटील, अभिजित गायकवाड, अशोक पाटील, वजीर मकानदार, मनोहर जाधव, संजय कांबळे, योगेश शेटे,प्रसाद जोशी, समीराज नलवडे, अतुल ठाकूर, अरविंद गवळी, राजू लंबे, बसू कोळी, सर्जेराव चोपडे, रुकडिकर, प्रल्हाद खाडे आदी उपसस्थित होते .
फोटो
शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना लेखी निवेदन देतांना बाबासाहेब पाटील व इतर पदाधिकारी