हेरले /प्रतिनिधी
दि.8/7/21
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ या संस्थेच्या शासन नियुक्त संचालक पदावर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नुकतीच निवड करण्यात आली.यावेळी त्यांचा श्री जय हनुमान सहकारी दूध संस्था मौजे वडगाव व शिवसेना शहर मौजे वडगाव यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले की शिवसेनेमध्ये शहर प्रमुख ते जिल्हाप्रमुख व आत्ता कोल्हापूर जिल्ह्यात अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ या संस्थेवर शासन नियुक्त संचालक म्हणून काम करण्याची संधी देऊन पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे .गेली वीस वर्षे शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केल्याचे फळ मिळाले असून येथून पुढेही शिवसेना पक्ष,प्राथमिक दूध संस्थेच्या दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी जय हनुमान सहकारी दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन बाळासाहेब थोरवत, व्हा.चेअरमन नेताजी माने, शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश कांबरे, शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य अवधूत मुसळे ,संचालक महादेव शिंदे यांच्यासह दूध संस्थेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
गोकुळचे शासन नियुक्त संचालक मुरलीधर जाधव यांचा सत्कार करताना बाळासाहेब थोरवत, नेताजी माने ,सुरेश कांबरे, अवधूत मुसळे, महादेव शिंदे व इतर मान्यवर