हेरले / प्रतिनिधी
दि.23/7/21
मुडशिंगी (ता. हातकणंगले ) येथील
जय भवानी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून व दलितमित्र डॉ. अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीमुळे गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्यचे नेते तथा जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी अनुसे , अनिरुद्ध शिंदे , संतोष शिंगाडे, शरद पवार, बाळासो हराळे, शामराव अनुसे, रावसाहेब अनुसे , शिधु मंडले, सखुबाई मंडले, संजूबाई मंडले व मुडशिंगी मधील ग्रामस्थ व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
मुडशिंगी येथील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करतांना हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्यचे नेते तथा जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ.अशोकराव माने शेजारी अन्य मान्यवर.