कोल्हापूर दि.4/07/2021
कसबा बावडा ऊलपे हॉल येथे सौ.मंगल आनंदा मोरे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम कुंभार यांनी केले.मंगल मोरे या मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळेत 6 वर्ष कार्येरत होत्या. त्यांची एकूण सेवा 30 वर्ष झाली आहे.त्या शाळेत नेहमी वक्तशीर असायच्या त्या स्वच्छता आणि टापटिप पणा यात खूप अग्रेसर होत्या. कार्यालयीन कामकाजात देखील कार्यतत्पर असायच्या. त्या जितक्या कडक तितक्या मायाळूपण आहेत असे स्वभाव वैशिष्टे आणि त्यांच्या कार्याची महती सांगणारे मनोगत राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार भिमराव पाटील, उत्तम कुंभार सर आणि सुजाता अवटी यांनी व्यक्त केले.
त्यांना सर्व शिक्षक स्टाफकडून भावी आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर मंगल मोरे यांचा शाळेमार्फत शाल, श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार भिमराव पाटील, उत्तम कुंभार, सुजाता अवटी, सुशील जाधव, शिवशंभू गाटे, आसामा तांबोळी, तमेजा मुजावर, बालवाडी मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सावित्री काळे, रजाक तांबोळी ,प्रिन्स शिवाजी शाळेच्या मुख्याध्यापिका छाया पवार, शाहजी पाटील, जोतिबा बामणे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शिवशंभू गाटे यांनी मानले.