कसबा बावडा : दि 5
कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण समितीचे संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11 मध्ये राजेंद्र आपुगडे समन्वयक समावेशीत शिक्षण कोल्हापूर व केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांच्या हस्ते व तानाजी पाटील ( T. R ) यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शोशल डिस्टन्स च्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आली.
राजेंद्र आपुगडे यांनी कोरोनाकाळात पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे काळजी घेऊन ऑनलाइन शिक्षण व ऑफलाईन शिक्षण ची व्यवस्था करून देऊन दररोज वेळ द्यावा.शिक्षणाचे शिक्षकांनी तयार केलेले व्हिडीओ, सेतू अभ्यासक्रम नियमितपणे घ्यावा व विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास पूर्ण करून घ्यावा असे प्रतिपादन केले.
शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ.अजितकुमार पाटील यांनी शुद्ध हवा , पाणी, आरोग्याची गुरुकिल्ली आहे. स्वच्छता केल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. महात्मा गांधीजी यांनी आपल्या वर्धा साबरमती आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते स्वच्छतेचे महत्व व स्वावलंबी शिक्षणाचे धडे देत असत. कोरोना काळात अगदी प्रत्येक माणूस अस्थिर झालेला दिसून येत आहे. त्यासाठी वैयक्तिक स्वच्छता प्रत्येकाने राखली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी, बाजार पेठेत, भाजीपाला मंडई, दुकानामधील दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करतांना सुद्धा स्वच्छतेची खबरदारी घ्यावी. दररोज योगासने, प्राणायाम , सूर्य नमस्कार , ताजी फळे, भाजीपाला , कडधान्ये यांचा वापर आहारात करावा व जागरण टाळावे असे प्रतिपादन केले.ऑनलाइन व सेतू अभ्यासक्रम यावर पालकांनी विद्यार्थ्यांना मदत करावी.असे प्रतिपादन केले.
तानाजी पाटील सर यांनी विद्यार्थी व पालक यांनी समन्वय साधून एक मैत्रीपूर्ण,सहकारी मित्र या भावनेने आपल्या पाल्याशी नाते ठेवून त्यास अभ्यास करण्यासाठी प्रेरणा द्यावी असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे नियोजन तमेजा मुजावर मॅडम, विद्या पाटील मॅडम यांनी केले होते.सूत्र संचालन सुजाता आवटी मॅडम व आसमा तांबोळी मॅडम यांनी केले होते.
शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा अनुताई गायकवाड, अध्यक्ष रमेश सुतार, शिक्षणतज्ञ इलाई मुजावर सर,सुशिल जाधव,उत्तम कुंभार, सरदार पाटील, यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
शिवशंभू गाटे यांनी आभार मानले.