कोल्हापूर प्रतिनिधी.
इनरव्हील क्लब ऑफ सनराईज, कोल्हापूर
यांच्या वतीने आज दिनांक 30 जुलै 2021 रोजी ऑक्सिजन हिल हा उपक्रम राबविण्यात आला.
ऑक्सिजनची आवश्यकता गेल्या काही काळामध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. पर्यावरणाचा समतोल आणि ऑक्सिजन पुरवठा इत्यादी गोष्टींचा विचार करता सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापूरच्या इनरव्हील क्लब ऑफ सनराईजच्या वतीने 500 झाडे 3 टप्प्यात लावण्याचा मानस क्लब अध्यक्षा सौ. शर्मिला खोत आणि सेक्रेटरी सौ. मनीषा जाधव यांनी घेतला आहे.
या पहिल्या टप्प्यात या कार्यक्रमाची सुरुवात करताना आज टेंबलाई हिलच्या परिसरात सुमारे ... ऑक्सिजन मुबलक प्रमाणात देणाऱ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आली. वृक्षांची लागवड त्यासोबतच निगा राखण्याचे कार्य असेच अविरत घडले पाहिजे. तसेच कोल्हापूरच्या चारही बाजूंनी वेढलेल्या टेकड्यांवर असा पर्यावरणसहाय्यक उपक्रम राबविला पाहिजे, यासाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, असे मत मालोजी राजे छत्रपती यांनी मांडले. तसेच पुढील निगडीत कार्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये सिंहाचा वाटा उचलण्याची त्यांनी ग्वाही दिली.
अध्यक्षा सौ. शर्मिला खोत यांनी पुढील टप्प्यात होणाऱ्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. तसेच मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
तसेच क्लबच्या सेक्रेटरी सौ मनीषा जाधव यांनी (मालोजीराजे छत्रपती, महापालिका उद्यान व्यवस्थापन समिती व कर्मचारी, व सहयोगी तरुण मंडळे यांचे)आभार मानले
यासाठी उपक्रमाच्या चेअरमन सौ स्मिता खामकर यांचे मार्गदर्शन लाभले. क्लब मेंबर्ससह कोल्हापुरातील तरुण मंडळे ....... यांचे सहकार्य लाभले.
महानगरपालिका उद्यान कमिटी/विभागाचे प्रमुख.... तसेच कर्मचारी यांचे सहयोग प्राप्त झाले.
यावेळी क्लब मेंबर्सनी स्वतः वृक्षारोपण केले. यावेळी...... उपस्थित होते.