सद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू आहे या अनुषंगाने महानगरपालिके तर्फे सिंगल युज प्लास्टिक चा वापर कऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे .
नागरिकांनी प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा आणि आपले शहर प्लास्टिक मुक्त करून कोल्हापूर महानगरपालिकेने सहभाग घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण2022 व माझी वसुंधरा अभियान मध्ये आपल्या शहराला जास्तीत जास्त गुणांकन मिळवून देने साठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे उप आयुक्त रविकांत आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली म.न.पा.राजर्षी शाहू विद्यामंदिर कासबा बावडा येथे कागदी पिशवी बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यशाळेमध्ये डॉ अजितकुमार पाटील, हेमंतकुमार पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थाना घरातील वर्तमान पत्रापासून अत्यंत सोप्या पद्धतीने कागदी पिशवी कशी बनवता येऊ शकते याबाबत प्रात्यक्षिक दाखवून माहिती देण्यात आली तर या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी ही प्रात्यक्षिक दाखविले प्रमाणे वर्तमान पत्रपासून उत्कृष्ट कागदी पिशव्या बनविल्या.
यावेळी माहिती शिक्षण व संवाद अधिकारी निलेश पोतदार स्वच्छ सर्वेक्षण 2022 चे ब्रँड अँबेसिटर शिक्षक सुभाष मराठे मुख्याध्याक डॉ अजितकुमार पाटील,उत्तम कुंभार, सुजाता आवटी,शिवशंभु गाटे, तमेजा मुजावर,आसमा तांबोळी, विद्या पाटील,हेमन्तकुमार पाटोळे, संदीप खोत तसेच विद्यार्थी वेदांतीका पाटील,सार्थक पाटोळे,विनायक पाटोळे,जय सुतार,इतर विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने उपस्थित होते.