कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशन कोल्हापूर यांच्यावतीने रविवार ९ जानेवारी २०२२ रोजी मराठी पत्रकार पत्रकार दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण समारंभ'संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे ( ता. हातकणंगले) येथे सकाळी १०.०० वाजता आयोजित केला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकाळ माध्यम समुहाचे संपादक संचालक:श्रीराम पवार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.शैलेश बलकवडे,संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून संजय घोडावत पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य विराट गिरी,कार्यकारी संपादक बी न्यूज ताज मुल्लाणी,दै.लोकमतचे वरिष्ठ पत्रकार समिर देशपांडे,दै.नवराष्ट्रचे आवृत्तीप्रमुख दीपक घाटगे आदी मान्यवरांच्या उपस्थित हा समारंभ आहे.
या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराची घोषणा अध्यक्ष सुधाकर निर्मळे,उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी,सचिव सुरेश पाटील,खजाणिस सदानंद ऊर्फ नंदकुमार कुलकर्णी,जागल्या स्मरणिका संपादक प्रा.रवींद्र पाटील,कौन्सिल मेंबर अतुल मंडपे,सुरेश कांबरे यांनी केली.
जिल्हा जीवनगौरव पुरस्कार
राजेंद्र होळकर(दै.तरुण भारत),
जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुरेश पाटील(दै.तरुण भारत),
संदीप राजगोळकर (टीव्ही ९ मराठी न्यूज चॅनेल),
जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार
प्रा.अशोक पाटील (दै. सकाळ),
जिल्हा उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार - नामदेव कुसाळे (एस न्यूज टीव्ही चॅनेल),
तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
विनोद पाटील (दै. पुण्यनगरी)
निखिल विभुते (दै.लोकनेता)
रमेश साबळे (दै.लोकमत)
श्रीपाद स्वामी (दै. पुण्यनगरी)
रंगराव बन्ने (दै. तरुण भारत),
बाबुराव वंदुरकर (दै. पुढारी),
सदाशिव आंबोशे ( दै. तरुण भारत),
आनंदा वायदंडे (दै.लोकमत),
भिकाजी पाटील(दै.पुण्यनगरी),
ज्योतिप्रसाद सावंत (संपादक मृत्युंजय महान्यूज /दै.नवराष्ट्र)
नारायण गडकरी ( दै. पुढारी),
संजय पोवार (दै.पुढारी),
डॉ.तुकाराम पाटील (दै.पुण्यनगरी),
दत्ताजीराव देसाई (दै. पुढारी),
प्रकाश सांडुगडे ( दै. तरुण भारत),
भानुदास गायकवाड (दै. तरुण भारत)
शिवाजी चव्हाण ( दै.राष्ट्रगीत)
विठ्ठल मोहिते (दै. पुण्यनगरी )
या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हयातील सर्व पत्रकार बंधुंनी उपस्थित राहावे.असे आवाहन अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी केले आहे.