हेरले (प्रतिनिधी)
मौजे वडगाव ता. हातकणंगले येथील शिवसेना शाखा व हनुमान दूध संस्था मौजे वडगाव यांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पंचायत समितीचे सदस्य उत्तम सावंत व शिवसेना शहरप्रमुख सुरेश कांबरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या रोखठोक भूमिका आणि भल्याभल्या राजकारण्यांना घाम फोडणारे एक बिनधास्त व्यक्तिमत्व होते. एक पक्ष, एक मैदान ,आणि एकच नेता, अशी ख्याती असलेले महाराष्ट्रातील ते एकमेव नेते होते .ते भाषण करीत असताना कोणाचीही भीडभाड ठेवत नसत त्यामुळे त्यांच्या स्पष्ट आणि जहाल भूमिकेमुळे ते ,हिंदुहृदयसम्राट, म्हणून ओळखले जाऊ लागले.
यावेळी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, शिवसेना शहरप्रमुख सुरेश कांबरे, ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब थोरवत, ग्रामपंचायत सदस्य अवधूत मुसळे ,अविनाश पाटील, सुनील खारेपाटणे, संतोष मोरे ,अमोल झांबरे, स्वप्नील चौगुले, महादेव चौगुले, अण्णासो पाटील, महेश मोरे, विलास घुगरे, यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना पं. समिती सदस्य उत्तम सावंत, शिवसेना शहर प्रमुख सुरेश कांबरे, व शिवसैनिक पदाधिकारी