म. न. पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11 कसबा बाबडा मध्ये ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण प्राथमिक आरोग्य केंद्र बावडाचे वैदयकीय अधिकारी अमर पोवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील होते. या कार्यक्रमामध्ये शिक्षक पतसंस्थेचे सभापती माननीय श्री वसंत आडके यांच्या हस्ते १लीच्या विद्यार्थ्यांना 9 दप्तर वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगुले व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रमेश सुतार होते
विद्यार्थ्यांनी कर्मा काळातील अभ्यासाचा फायदा घेऊन ज्ञान आत्मसात करावे विविध विषयांमध्ये प्रभुत्व संपादन करावे तसेच मराठी हिंदी इंग्रजी या विषयांचा अभ्यास लक्षपूर्वक व काळजीपूर्वक करावा जेणेकरून भविष्यामध्ये एमपीसी यूपीसी अभ्यास स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आपणास वेळ व तयारीसाठी वेळ मिळेल ज्ञान आत्मसात करण्यासाठी सतत वाचन व चिंतन व मनन लेखन करावे तरच आपणाला दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या सामाजिक परिस्थितीचा व दैनंदिन घडामोडींचा अभ्यास होणार आहे भारतीय लोकशाहीची परंपरा ही जगामध्ये आदर्श व प्रमाणबद्ध अशी आहे जगामध्ये भारतीय संस्कृती प्रसिद्ध आहे तसेच विज्ञान व अध्यात्म यांची संस्कार असे परंपरा लाभलेला एकमेव देश म्हणजे भारत देश आहे भारतामध्ये ज्याप्रमाणे विविध जाती धर्माचे लोक एकपर्यंत नांदत आहेत त्याप्रमाणे संस्कृतीही एकमेकाच्या आचार-विचार संस्कृतीवर परंपरा यांचा आदर्श घेऊन आदर्श भरत असे लोकशाही बनत चाललेले आहे भारतामध्ये एक समृद्ध अशी लोकशाही परंपरा लाभलेला देश आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन अभ्यासामध्ये करावा व देशाचे नाव मोठे करावे असे आवाहन डॉ राजकुमार पाटील यांनी केले.
शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्षा अनुराधा गायकवाड, ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार,सुशील जाधव, शिवशंभू गाटे,सुजाता आवटी, आसमा तांबोळी, विदया पाटील, तमेजा मुजावर, हेमंतकुमार पाटोळे, कल्पना पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंभु गाटे यांनी केले