हेरले / प्रतिनिधी
वीर सेवा दल शाखा व अंकूर फाऊंडेशन हेरले यांच्या संयुक विद्यमाने नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला ३१ डिसेंबर रोजी रात्रौ ८ ते १० वाजेपर्यंत झेंडा चौक येथे व्यसन मुक्ती हीच देशाची शक्ती. आवाज तरुणाईचा संकल्प व्यसनमुक्त राष्ट्र निर्मितीचा, दारु नको दूध प्या, या संदेशाचा नारा देत या उपक्रमा अंतर्गत मोफत मसाला दूध वाटप करण्यात आले. गावातील तरुण वर्गाने, लहान, थोरांनी या उपक्रमात सहभागी होऊन गुलाबी थंडीच्या रात्री गरम मसाले दूधाचा अस्वाद घेतला.
या कार्यक्रमाचे संघनायक संकेत पाटील, उपसंघनायक अरिहंत परमाज साहिल पाटील सम्मेद हणमंत आशिष माणगावे संदेश चौगुले अमोल पाटील बाळगोंड पाटील विशाल परमाज संदीप परमाज आदींनी संयोजन केले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून या संयोजक तरुणांचे अभिनंदन होत आहे.
फोटो
हेरले येथे ३१ डिसेबर रोजी रात्री मसाला दूध वाटप करतांना वीर सेवा दलाचे युवक सदस्य.