हेरले (प्रतिनिधी ) राज्य शासनाने कोरोना लसीकरणाची सक्ती केल्याने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी मोठ्या रांगा लागत आहेत. दरम्यान ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले असून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम मौजे वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने सुरू केली आहे. लोकसेवा शिक्षण संस्था संचलित बालावधूत हायस्कूल मध्ये जाऊन १५ ते १८ वयोगटातील इयत्ता नववी व दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे १००% लसीकरण करण्यात आले.
शासनाच्या आदेशान्वये मंगळवार दिनांक १२ रोजी १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शाळेत जाऊन सुरू केले होते. यामध्ये पंधरा वर्षावरील नववी व दहावीच्या एकूण १५० विद्यार्थ्यांचे लसीकरण मंगळवारी करण्यात आले. या मोहिमेचा शुभारंभ शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन सदाशिव चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पंकज पाटील, संजीवनी वाघमोडे, आशा वर्कर्स शितल चौगले ,रेखा मोरे, मुख्याध्यापक संजीव चौगुले ,आर. बी .पाटील, आर.एस. स्वामी. दत्तात्रय ढोंगे, सरोजिनी कारंडे ,उपस्थित होते.
फोटो
पंधरा वर्षांवरिल विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये जाऊन लसीकरण करताना आरोग्य अधिकारी.