हेरले/ प्रतिनिधी
वडगांव पोलीस ठाण्याच्या वतीने शासन स्तरावरील निर्देशानुसार नववर्षाच्या सुरुवातीस नागरिकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये विविध कायद्यांची जागृती होण्यासाठी 'राईजिंग डे ' अभियान सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती सुर्यवंशी यांनी वडगांव विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना विविध कायद्यांचे महत्त्व या निमित्ताने विषद करून मार्गदर्शन केले.
सपोनि स्वाती सुर्यवंशी म्हणाल्या, शालेय विद्यार्थ्यांचे १८ वर्षापेक्षा वय कमी असल्याने दुचाकी वाहन चालवू नये. वाहन चालविण्याचा परवाना मिळण्याचे आपले वय नसल्याने आपणावर व पालकांवर कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा नोंद होऊ शकतो. यामुळे आपल्यावर गुन्हा नोंद झाल्याने आपले करिअर धोक्यात येऊ शकते व पालकांना आर्थिक दंड व कायदेशीर अनेक कारवाईंना सामोरे जावे लागते.
शालेय जीवनापासून सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळून प्रवास करणे महत्त्वाचे आहे. यामुळे अपघाताचे प्रसंग घडण्याचे प्रमाण कमी होते. शालेय मुलींची छेडछाड होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मुलींनी आपल्याला त्रास देणाऱ्यांची नावे शाळेत निर्भयपणे आपल्या शिक्षकांना सांगावित ते आमच्याकडे त्या बाबतीत माहीती देतील त्या अनुषंगाने पोलिस दल छेडछाड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केरेल.
विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यास कारणाशिवाय व विधायक कार्याशिवाय अँड्राईड मोबाईलचा वापर टाळावा. या ॲड्राईड मोबाईलच्या वापरामध्ये आपला वेळ वाया न घालवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. मोबाईल वरून सायबर गुन्हेगारी फोपावली आहे. त्यामुळे फसवा फसवीचे प्रकार, सोशल मीडिया वरून अक्षेपार्ह संदेश यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येत आहे. त्यामुळे या अनावश्यक मोबाईल वापरापासून शालेय जीवनामध्ये सावध राहणे गरजेचे ठरत आहे. आदी विषयांवरती मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना कायद्याच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन सपोनि स्वाती सुर्यवंशी यांनी केले.
या प्रसंगी पर्यवेक्षक डी.के. पाटील, नेताजी वडगावकर, एस.डी. बाबर ,पोशी वाघमारे,पोशी शेलार आदी मान्यवरांसह विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो
वडगांव विद्यालयामध्ये बोलतांना वडगांव पोलिस ठाण्याच्या सपोनि स्वाती सुर्यवंशी