को म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11,कसबा बावडा,सी आर सी 7 कोल्हापूर मध्ये केंद्रस्तरीय ऑनलाइन शिक्षण परिषद शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई,केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी ऑनलाईन केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेच्या निमित्ताने भाषा पेटी,शंभर दिवस वाचन प्रकल्प याबद्दल शाळा व विद्यार्थी पालक यांनी विद्यार्थ्यांना कशाप्रकारे वाचनाची गोडी वाढविण्यासाठी शैक्षणिक उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना वाचनास प्रवृत्त करण्यात यावे जेणेकरुन विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने वाचनाची गोडी वाढून तो मराठी भाषा वाचनसंस्कृतीसाठी समृद्ध असे साहित्य निर्माण करू शकेल .पालकांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी कशी वाढवण्यासाठी उपक्रम घेऊन तो वाचनालय किंवा पुस्तकाच्या माध्यमातून तो मराठी भाषेवर प्रभुत्व गाजवले व मराठी भाषेला अभिमान वाटेल असे शिक्षण मिळण्याची प्रेरणा मिळेल असे महत्व प्रतिपादन केले.
तज्ञ मार्गदर्शक म्हणून शहाजी पाटील,अर्चना गवळी,विद्या पाटील,पूनम कोळी,तंत्रस्नेही म्हणून सोनाली मोरे तर आभार उत्तम कुंभार यांनी मानले गणित पेटी,भाषा पेटी,इंग्रजी पेटी,100 दिवस वाचन उपक्रम, रीड टू मी इत्यादी विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले.केंद्रशाळा म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11 कसबा बावडा सी आर सी 07 मधील 22 शाळेतील 88 मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षण तज्ञ यांनी या शिक्षण परिषदेच्या ज्ञानाचा लाभ घेतला.