Tuesday, 28 February 2023

नेहरू नगर विद्यालयात डी- मार्ट मार्फत डिजिटल पल्स अँड रीडिंग फेअर उपक्रम उत्साहात संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी 
 कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील शाळांमध्ये डी- मार्ट सीएसआरमार्फत अद्यावत संगणक लॅब व लायब्ररी उपक्रम राबवण्यात येत आहेत. सदर उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना संगणकाचे अद्यावत ज्ञान व वाचन क्षमता वाढवण्यासाठी डी- मार्ट चे नेहरूनगर विद्यालय, वीर कक्कय विद्यालय,प्रिन्स शिवाजी विद्यालय, जाधववाडी व लक्ष्मीबाई जरग विद्यालयांमधील शिक्षक व नेहरूनगर विद्यामंदिर चे विद्यार्थी यांनी स्वनिर्मित प्रदर्शनाची मांडणी केली आहे .
सदर प्रदर्शनामध्ये 3D मॉडेल्स,ब्लॉकबस्टर गेम, स्टुंडन्ट जर्नी,टीचर जर्नी फँटॅस्टिक सीट,डॉग स्टार, शब्दकोडे वाचनालय प्रतिकृती,हॅलो कोल्हापूर आजच्या घडामोडी,सेल्फी कट्टा, कवितेची मैफिल, चला करूया भारताची सफर, विद्यार्थी प्रवास, डिजिटल फल्स रोबो इत्यादी साहित्याची मांडणी विद्यार्थी व शिक्षकांनी आकर्षकरित्या केली आहे .
सदर प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रशासन अधिकारी एस. के. यादव, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी,क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, शांताराम सुतार रीडिंग प्रोग्रामच्या असोसिएट मॅनेजर मानसी चौहान, डिजिटल प्रोग्रॅमच्या असोसिएट मॅनेजर रश्मी सिंग, पर्यवेक्षक निशा साळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा  पद्मजा ओंकार,मुख्याध्यापिका नलिनी साळुंके,उपस्थित होत्या. 
 सदर प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील संत रोहिदास विद्यालय, वीर कक्कय विद्यालय ,लक्ष्मीबाई जरग नगर विद्यालय, सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यालय, उर्दू सरनाईक वसाहत विद्यालय या विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी ,शिक्षक पतसंस्थेचे सभापती उमर जमादार,उपसभापती कुलदीप जठार,सुजाता पोवार,मयुर जाधव,स्वाती सुर्यवंशी ,दिपाली कुंभार,डॉ स्वाती पाटील ,नितिन खुडे,शकील भेंड़वाड़े,संदीप सुतार व शाळेचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता खुडे व सविता जमदाडे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका नलिनी साळुंके यांनी केले. प्रास्ताविक संजय पाटील  यांनी केले.कार्यक्रमाची रूपरेषा कविता कांबळे यांनी मांडली.तर आभार अनिल शेलार यांनी मांडले.

Sunday, 26 February 2023

सीआयआय दक्षिण महाराष्ट्र झोनच्या अध्यक्ष पदी सोहन शिरगावकरउपाध्यक्ष पदी अजय सप्रे यांची निवड

कोल्हापूर /प्रतिनिधी

  कॉनफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिजच्या (सीआयआय) दक्षिण महाराष्ट्र झोनची शनिवार २५ फेब्रुवारी रोजी वार्षिक बैठक
कोल्हापुरातील हॉटेल पॅव्हेलियनमध्ये  संपन्न झाली. या बैठकीमध्ये एस. बी. रेशेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सहव्यवस्थापकीय संचालक  सोहन शिरगावकर यांची सीआयआय दक्षिण महाराष्ट्र झोनच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. पार्टनर सप्रे प्रेसिजन टेक्नॉलॉजीजचे अजय सप्रे  यांची सीआयआय दक्षिण महाराष्ट्र झोन 2023-24 या कालावधीसाठी उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
    नुतन अध्यक्ष सोहन शिरगावकर म्हणाले,“आम्ही दक्षिण महाराष्ट्र झोनमधील उद्योगांच्या सुधारणेसाठी स्थानिक संघटनांसोबत जवळून काम करू. उत्पादन, एमएसएमई, कास्टिंग आणि फोर्जिंग, फूड प्रोसेसिंग इत्यादींवर लक्ष केंद्रित करून आम्ही वर्षभर विविध सत्रांचे आयोजन करू. चालू वर्षात उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी सीआयआय अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झाले आहे आणि आम्ही राज्यातील उद्योगांच्या सुधारणेसाठी काम करत राहू. उद्योगाची वाढ, कामगार वर्गात कार्यक्षमत वाढवणे,सरकारशी संलग्नता हे आमचे मुख्य लक्ष असेल.
   नुतन उपाध्यक्ष अजय सप्रे म्हणाले,
आमचा फोकस आमच्या सदस्यांशी अधिक गुंतवून ठेवण्यावर आणि दक्षिण महाराष्ट्र प्रदेशातून आणि आजूबाजूला आमचा सदस्यसंख्या वाढवण्यावर असेल.
   या प्रसंगी, “डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन – एन : एबलिंग द एचआर” या विषयावर एक सत्र देखील आयोजित करण्यात आले होते. सत्राला संबोधित करताना सीआयआय ( डब्ल्यू आर ) उप-समिती आय आर  आणि विविधता आणि 
सी एच आर ओ चे अध्यक्ष तथा  किर्लोस्कर न्यूमॅटिकचे उपाध्यक्ष
  डॉ. सदाशिब पाध्ये यांनी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवरील विविध उपक्रमांची माहिती दिली आणि ते मानव संसाधन कसे शक्य आहे त्याची माहिती दिली. या प्रसंगी सीआयआय चे कोल्हापूर,सांगली, सातारा, रत्नागिरी आदी जिल्हयातील पन्नस उदयोगपतीसदस्य उपस्थित होते.
या प्रसंगी उद्योगपती सचिन शिरगावकर, मंगेश पाटील, सारंग जाधव, प्रसाद गुळवणी, संदीप इंगळे, कुशल समानी, विरेंद्र पाटील, योगेश कुलकर्णी, शरन्या मेनन, गौरी शिरगावकर आदी मान्यवरांसह या प्रसंगी सीआयआयचे कोल्हापूर,सांगली, सातारा, रत्नागिरी आदी जिल्हयातील पन्नास उदयोगपती सदस्य उपस्थित होते.
    फोटो 
नुतन अध्यक्ष सोहन शिरगावकर व नुतन उपाध्यक्ष अजय सप्रे यांचा सत्कार करताना  रोशन कुमार , मावळते अध्यक्ष रवी डोली आदी मान्यवर.

Saturday, 25 February 2023

जुन्या पेन्शनसाठीचा ४ मार्चचा मोर्चा यशस्वी करणार : शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर शैक्षणिक व्यासपीठ, शासकिय व निम शासकिय कर्मचारी समन्वय समितीचा निर्धार


कोल्हापूर /प्रतिनिधी
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी व त्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, शासकिय कर्मचारी विद्यापीठ व महाविद्यालयान शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे यासाठी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. ४ मार्च रोजी काढण्यात येणारा भव्य मोर्चा शंभर टक्के यशस्वी करणार असा निर्धार शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर तसेच कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, कोल्हापूर जिल्हा शासकीय निम शासकीय कर्मचारी, विद्यापीठ व महाविद्यालयीन क्षेत्रातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथे आयोजित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेत निर्धार केला. अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते.
       आमदार प्रा. जयंत आसगावकर 
सभेस मार्गदर्शन करतांना म्हणाले या मोर्चाची एकमेव मागणी म्हणजे सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करून घेणे. यासाठी सातत्याने सर्व संघटनांनी ताकदीनिशी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
    शनिवार दिनांक ४ मार्च रोजी निघणाऱ्या या मोर्चाची सुरुवात  सकाळी ११ वाजता शिवाजी पेठेतील गाधी मैदान येथून होईल. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  पोहचेले नंतर मोर्चाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देतील.
      कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक महाविद्यालयीन प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक विद्यापीठ व महाविदयालयीन शिक्षकेत्तर सेवक, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, सुटा व 
सुफ्टाचे सर्व सदस्य व अनेक संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत.
    या सभेस चेअरमन सुरेश संकपाळ,शिक्षक नेते दादा लाड डॉ. डी. एस. घुगरे, बी. जी. बोराडे, वसंतराव देशमुख,प्रा.सी.एम.गायकवाड,
बाबासाहेब पाटील, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, प्रा. अविनाश तळेकर, सतिश बर्गे,उदय पाटील, मोहन भोसले, व्ही. जी. पोवार, गौतम वर्धन, प्रसाद पाटील, सुधाकर सावंत, आर.डी. पाटील, बी.डी. पाटील. पी. एस. हेरवाडे, प्रा. रघुनाथ ढमकले,मिलींद भोसले, आण्णासाहेब बागडे, संदीप पाथरे,अरुण मुजुमदार, इरफान अन्सारी,जगदीश शिर्के, अनिल घाडगे,मनोहर जाधव, 
प्रा. हजारी, शिवाजी लोंढे आदीसह शिक्षक व शिक्षकेत्तर  संघटनाचे जिल्हाध्यक्ष सचिवसह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येंनी उपस्थित होते.
    फोटो 
कोल्हापूर :  शैक्षणिक व्यासपीठ, शासकिय व निम शासकिय  समन्वय समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर शेजारी एस. डी. लाड, दादा लाड, बी. जी. बोराडे ,चेअरमन सुरेश संकपाळ आदी मान्यवर.

डॉ दीपक शेटे यांना सावित्रीबाई फुले राज्य गौरव पुरस्कार प्रदान

कोल्हापूर / प्रतिनिधी
 महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सन -२०२१/२२ चे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य गौरव शिक्षक पुरस्कार स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन मिणचेचे शिक्षक डॉ.दिपक शेटे  यांना पर्यटन , कौशल्य विकास विभाग महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मा .ना . मंगलप्रभात लोंढा मुंबई यांच्या शुभहस्ते प्रधान करण्यात आला.
  डॉ . दीपक शेटे हे नागाव तालुका हातकणंगले या गावचे रहिवाशी असून गेली बावीस वर्षे गणित विषयाचे अध्यापन करत आहेत .मुलांना गणित सोपं जावं यासाठी ते सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम शालेय स्तरावर  राबवत असतात .यासाठी त्यांनी त्यांच्या घरी 35 लाख रुपयाची महाराष्ट्रातील अनोखी गणित मोजमापनाची लॅब तयार केले आहे .ती पाहण्यासाठी गणित अभ्यासक, गणितज्ञ, शिक्षक, पालक व विद्यार्थी सातत्याने येत असतात . विद्यार्थ्यांना गोडी लागावी व गणिताचा प्रचार व्हावा यासाठी ते विनामूल्य शाळेच्या कामकाजा व्यतिरिक्त माहिती  सांगत  असतात .त्यांनी आतापर्यंत सात पुस्तकांचे लेखन केले असून तंत्रज्ञानाचा वापर करून दहावीचे पुस्तक एका पानात बनवण्याची किमया केली आहे .स्टार अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ही त्यांच्या संस्थेमार्फत सातत्याने केला जातो .सातत्यपूर्ण दहावीचा शंभर टक्के निकालाची परंपरा त्यांनी आज अखेर राखली आहे .त्यांचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावर काम करत आहेत .त्यांच्या शैक्षणिक कालावधीमध्ये तज्ञ मार्गदर्शक ,गणित व्याख्याते ,सहशालेय उपक्रमात सक्रिय सहभाग ,विज्ञान प्रदर्शन परीक्षक इ.भूमिका पार पडले आहेत .त्यांच्या  नावीन्यपूर्ण उपक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे .
 त्यांना संस्थेचे प्राचार्य डी.एस. घुगरे सचिव एम ए परीट यांचे सहकार्य लाभले . व डाएटचे प्राचार्य आय.जी.शेख ,माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर , अधिव्याख्याता रमेश कोरे मार्गदर्शन लाभले . यावेळी प्रधान सचिव रंजीत सिंह देओल,आयुक्त शिक्षण विभाग सुरज मांढरे ,आमदार कपिल पाटील आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते .
 त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे .

सीआयआय दक्षिण महाराष्ट्र विभागीय परिषद बैठकीचे आयोजन

हेरले / प्रतिनिधी
सीआयआय दक्षिण महाराष्ट्र  विभागीय परिषदेची बैठक शनिवार दि. २५ रोजी सायंकाळी ७ वा. हॉटेल पॅव्हेलियन कोल्हापुरात येथे होत आहे. या मध्ये  दक्षिण महाराष्ट विभागामध्ये  केलेल्या कामाबद्दल तपशीलवार माहिती देण्यात येणार आहे आणि CII सीआयआय थीम इनोव्हेशन, ग्रोथ, सस्टेनेबिलिटी आणि तंत्रज्ञान आणि वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे .प्रमुख उपस्थिती म्हणून  डॉ. सदाशिब पाधी अध्यक्ष CII वेस्टर्न  sub commitee IR CHRO आणि उपाध्यक्ष HR Kirloskar Pneumatic Company Limited
 डॉ. पाधी हे Digita Transformation या विषयावर संबोधित करणार आहेत तसेच यावेळी सभासदांशी संवाद साधन्यासाठी  रवी डोली, अध्यक्ष, CII दक्षिण महाराष्ट्र विभाग अध्यक्ष रवी डोली,आणि उपाध्यक्ष, CII दक्षिण महाराष्ट्र झोन उपाध्यक्ष सोहन शिरगावकर हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Wednesday, 22 February 2023

मौजे वडगावच्या जय हनुमान तालमीत पुन्हा घुमणार शड्डूचा आवाज

हेरले /प्रतिनिधी  
मौजे वडगावातील युवकांनी कुस्ती क्षेत्रामध्ये गतवैभव प्राप्त करून दयावे तसेच शालेय शिक्षणा बरोबर कुस्तींचे धडे अंगीकारावे असे उदगार उपसरपंच सुनिल खारेपाटणे यांनी काढले ते मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील जय हनुमान तालीम मंडळाच्या उद्घघाटनप्रसंगी बोलत होते.
       गेले काही दिवस जय हनुमान तालीम बंद आवस्थेत होती . परंतू काही युवा कुस्ती शौकिनांच्या इच्छा शक्ती मुळे व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने या तालमीची स्वच्छता करण्यात आली असून जुन्या काळातील वस्ताद बाळासो थोरवत, बाबासो सावंत ,धोंडिबा हजारी, जहांगीर हजारी, यांच्या सारखे जुने जानकार मल्ल तालमीत येणाऱ्या नवीन मल्लांना जोर ,बैठका , तसेच कुस्तीचे धडे देत त्यांच्या कडून सराव करवून घेत आहेत. तालमीच्या उद्घघाटनाच्या पहिल्याच दिवशी १६ मल्लांनी आपला सहभाग नोंदविला असून तब्बल १० ते १२ वर्षांनी या तालमीत शडूंचा आवाज घुमू लागला आहे. त्यामुळे गावातील कुस्ती शौकिना मध्ये आनंद व्यक्त होत आहे.
             या उद्घघाटन प्रसंगी सरपंच प्रतिनिधी अविनाश पाटील, उपसरपंच सुनिल खारेपाटणे , माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुरेश कांबरे , स्वप्नील चौगुले , रघूनाथ गोरड , अँड विजय चौगुले ,जयवंत चौगुले , ज्ञानेश्वर सावंत , संदिप नलवडे , अमोल झाबरे,अभिजीत थोरवत , तौफिक हजारी ,महादेव चौगुले ,रवि रेडेकर , अविनाश सावंत , विनायक शेंडगे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चौकट
जुन्या काळामध्ये कौटूबिंक परस्थिती हालाकीची असतांना सुद्धा पंचक्रोशीतील जत्रा यात्रामध्ये निकाली कुस्त्या करून गावाचे नाव उज्वल केले तसाच वारसा नवीन मल्लांनी चालवावा हि अपेक्षा
       वस्ताद पै . बाळासो थोरवत

चौकट
गावातील युवकांनी कुस्ती क्षेत्राकडे वळावे ध्येय निश्चित करूण मेहनतीच्या व कष्ठाच्या जोरावर कुस्तीमध्ये आपले नाव उज्वल करावे आडचणीचा काळामध्ये सर्व पैलवानांना माझे सहकार्य मिळेल .
          वस्ताद पै . बाबासो सावंत

फोटो 
जय हनुमान तालमीचे उद्घघाटन प्रसंगी कुस्ती लावतांना पै . बाळासो थोरवत व ग्रामपंचायत पदाधिकारी .

Sunday, 19 February 2023

हेरले (ता.हातकणंगले) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.

हेरले /प्रतिनिधी

हेरले ग्रामपंचायत येथे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे यांच्या हस्ते श्रीपळ वाढवून फोटो पूजन करण्यात आले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी बी. एस. कांबळे,ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले,अमित पाटील,मनोज पाटील,हिरालाल कुरणे व कर्मचारी उपस्थित होते.
   फोटो 
हेरले ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे शेजारी अन्य मान्यवर.

Saturday, 18 February 2023

शिवरायांचे गुण आत्मसात केल्यास व्यक्तिमत्व आदर्शवत होईल : माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर


पेठवडगांव / प्रतिनिधी
 जीवनात येणाऱ्या अनेक कठीण प्रसंगातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांचे एखादे गुण आत्मसात केल्यास व्यक्तिमत्व आदर्शवत होईल यात मुळीच शंका नाही.असे प्रतिपादन जिल्हा परिषद कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले. ते आदर्श गुरुकुल विद्यालय पेठ वडगाव येथे गुरुकुल शिवचरित्र पारायण सोहळा याप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.

शिक्षणाधिकारी पुढे म्हणाले की येथे येताच हे शिवमय वातावरण पाहून उत्साह निर्माण झाला. "छत्रपती शिवरायांनी अंगीभुत गुणांच्या साह्याने आयुष्यात येणाऱ्या विविध संकटासमोर त्यांनी कधीच हार मानली नाही,तह केला. पण हात मिळवणे कधीच केली नाही. अशा पराक्रमी छत्रपती शिवरायांचे गुण आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आदर्शवत बनवावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. 



या उपक्रमाची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रात व्हावी शिक्षणाधिकारी

हा शिवचरित्र पारायण सोहळा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. डॉ.दत्तात्रय घुगरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रात व्हावी याकरिता शिक्षण मंत्र्यांकडे केलेल्या उपक्रमाची व्हिडिओ स्वरूपात माहिती पाठवून या उपक्रमाची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये परिपाठच्या वेळी राबवण्यात येईल काय याविषयी पाठपुरावा करणार आहे.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय घुगरे व सचिव सौ. महानंदा घुगरे , प्रिस शिवाजी मराठा बोर्डिंग अध्यक्ष बी.जी.बोराडे,उपप्राचार्य एम.ए.परीट, छ.शिवाजी विद्यानिकेतन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र माने,डॉ. दिपक शेटे,जगदीश कुडाळकर,चंद्रकांत नेर्लेकर, तसेच परिसरातील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग ,व्यापारी शिक्षण पेठ वडगाव सदस्य, एशियन बुक ऑफ रेकॉर्ड सुनिल पाटील,पश्चिम महाराष्ट्र महिला प्रमुख डॉ. अंजना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर इंगवले यांनी केले.

Thursday, 16 February 2023

ट्रेण्डी व्हील मध्ये फ्री चेकअप मेगा कॅम्पचा लाभ घ्या : जनरल मॅनेजंर प्रशांत तोडकर


शिरोली / प्रतिनिधी
  कॅम्पमध्ये सर्व वाहनांना स्पेअर्स पार्टवर ५ टक्के व मजुरीवर १० टक्के, ५ टक्के ॲक्सेसेरीज व २५ टक्के
 मॅक्सीकेअर आदीवर डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच दररोज लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसे काढण्यात येणार आहेत. या योजनेचा महिद्राच्या पर्सनल सर्व वाहनधारकांनी लाभ घाव्या. असे आवाहन ट्रेन्डी व्हिल्स प्रा.लि. कंपनीच्या वतीने जनरल मॅनेजंर प्रशांत तोडकर यांनी केले.
    शिरोली एमआयडीसी नागाव फाटा
 (ता. हातकणंगले) येथील ट्रेन्डी व्हिल्स प्रा. लि. व महिद्रा आणि महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ७५ पॉईट फ्री चेकअप मेगा कॅम्पची सुरुवात झाली त्या प्रसंगी बोलत होते. या कॅम्पचे फीत कापून उद्घाटन व दीपप्रज्वलन सुधाकर निर्मळे यांच्या हस्ते करण्यात आले.
   या प्रसंगी सी.ई.ओ. सत्यजित लोखंडे, जनरल मॅनेजंर प्रशांत तोडकर, बिझिनेस हेड प्रविणकुमार चौहान, वर्क्स मॅनेजंर सतिश परमाज,एच.आर पंडीत भोसले, सी. आर. एम. पुनम जाधव, मॅनेजंर सागर कुबडे, मदन डांगे, संजय वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सतीश परमाज यांनी केले.
     फोटो 
शिरोली एमआयडीसी : ट्रेन्डी व्हील्स येथील ७५ पॉईट फ्री चेकअप मेगा 
कॅम्पचे उद्घाटन झाले याप्रसंगी सुधाकर निर्मळे जनरल मॅनेजंर प्रशांत तोडकर अन्य मान्यवर

Wednesday, 15 February 2023

एसटी फेरी बंद.. मुलींचे शिक्षणही बंद..! एसटीच्या फेऱ्या रोडावल्या. हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर टाच;मुक्कामी गाड्या व फेऱ्या नियमित करण्याची मागणी;मुरगूड विद्यालयाच्या विद्यार्थिनींची गारगोटी आगाराकडे मागणी


कोल्हापूर / प्रतिनिधी

   मुरगूड परिसरातील पन्नास हुन अधिक खेडेगावातील मुला मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या मुरगूड विद्यालय जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनीनी येथील एसटी नियंत्रण कक्षाकडे निवेदन देत"आपले शिक्षण बंद करू नका" अशी कळकळीची मागणी केली.
  इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा जवळ आल्या आहेत तरीही गारगोटी आगाराकडून मुरगुड आणि परिसरातील प्रवासी वाहतूक नियमित केली जात नाही.यापूर्वी अनेकदा विविध शैक्षणिक संस्थातील विद्यार्थी विद्यार्थिनीनी बंद,धरणे,एसटी रोको आंदोलन करून या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला पण अद्याप प्रशासनाचे डोळे उघडलेले नाही. या परिसरात खाजगी शैक्षणिक संस्थांच्या  विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस नियमित सुरू असतात.पण शासनाच्या विद्यार्थी कल्याण योजने अंतर्गत सुरू गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत व अल्प मोबदल्यात शैक्षणिक संकुलापर्यंत प्रवास देणाऱ्या सर्व योजना ठप्प पडल्या आहेत.बस फेऱ्या नियमित नसल्यामुळे डोंगरी दुर्गम खेड्यापाड्यातील शेकडो मुला मुली शाळेपासून वंचित आहेत.इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी या माध्यमिक व उच्च माध्यमिक  वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलींचे गळतीचे प्रमाण वाढले आहे.निपाणी मुरगूड ते मुधाळ तिट्टा रस्ता उभारणीचे काम अपूर्ण आणि धोकादायक स्थितीमध्ये कासव गतीने सुरू आहे.अशा परिस्थितीत मिळेल त्या वाहनातून प्राथमिक माध्यमिक शाळेची मुलं जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसतात.
या सर्व प्रकारास कंटाळून अनेक पालकांनी आपल्या मुला मुलींचे शिक्षण थांबवले आहे.ही स्थिती पुरोगामी महाराष्ट्राला शोभनीय नाही.या पार्श्वभूमीवर मुरगूड विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनीनी अत्यंत शिस्तबद्धपणे शिक्षक पालकांसह बस स्थानकावर उपस्थित राहून लेखी निवेदन  मुरगुड वाहतूक नियंत्रण कक्षाकडे आपले निवेदन दिले व एसटी सेवा नियमित करण्यासाठी विनंती केली.सोमवार पर्यंत एस टी वाहतूक फेऱ्या नियमित केल्या नाहीत तर विद्यार्थी पालकांसह मुरगूड बस स्थानकावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी प्राचार्य एस.आर.पाटील, उपमुख्याध्यापक एस.बी.सूर्यवंशी,उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य एस.पी.पाटील प्रशालेचे पर्यवेक्षक एस.एच.निर्मळे,तंत्र विभाग प्रमुख पी.बी.लोकरे,महादेव कांबळे,एम.बी.टिपूगडे,अमित भोई,विजय पाटील,समीर कटके,अनिल पाटील,एन.एन. गुरव,एस.एस. 
कळंत्रे,ए.एस. चंदनशिवे,महादेव खराडे,रवी बुरुड,सौ.वाय.इ. देशमुख,एस जे गावडे, जी पी गोधडे, के.एस.पाटील,संपत कोळी,पिंटू बोंडगे,सुनील गवळी,दयानंद कांबळे,सोपान खराडे,जोतिराम खराडे आदी उपस्थित होते.

Monday, 13 February 2023

चोकाक गावात शालेय विद्यार्थ्यांसाठी सायंकाळच्या अभ्यासिकेचा अनोखा उपक्रम


हेरले / प्रतिनिधी
चोकाक ( ता.हातकणंगले) येथे विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण व्हावी यासाठी चोकाक ग्रामपंचायत व गावातील शिक्षकांच्या सहकार्याने गावातील विद्यार्थ्यांसाठी सायंकाळच्या अभ्यासिका चे नियोजन करण्याचे योजना गावांमध्ये राबवली आहे, या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांचाही भरघोस असा प्रतिसाद लाभत आहे, सायंकाळचा वेळ विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ मोबाईल व टीव्ही यामध्ये व्यस्त असतात त्यामधून बाहेर पडून त्यांनी अभ्यास करावा, या उद्देशाने चोकाक  गावांमध्ये सायंकाळी साडेसहा ते साडेआठ गावातील प्राथमिक शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या साठी अभ्यासिकेचे नियोजन करण्यात आले या अभ्यासिकेसाठी गावातील सर्व शिक्षक सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत, सरपंच शरद चोकाककर व उपसरपंच प्रवीण माळी दोघेही शिक्षक असल्याने ही अनोखी योजना समोर आली व गावातील सर्व शिक्षकांनी लगेचच या उपक्रमास होकार दिल्याने अतिशय उत्साहात व विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसदमध्ये ही अभ्यासिका सुरू आहे यासाठी गावातील सर्व शिक्षक सेवाभावी वृत्तीने अभ्यासिकेला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावत आहेत या उपक्रमाचे गावामध्ये सगळीकडे कौतुक होत आहे.

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी उमर जमादार , उपसभापती कुलदीप जठार

**
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या सभापती पदी उमर जमादार यांची बिनविरोध निवड झाली तर उपसभापती पदी कुलदीप जठार,संस्थेच्या सचिव पदी सुधाकर सावंत व खजानिस पदी संजय पाटील यांची बहुमताने निवड करण्यात आली. संस्थेची निवडणूक नुकतीच झाली.निवडणूक निर्णय अधिकारी व्ही एम तोडकर यांच्या अध्यक्षते खाली  झालेल्या नूतन संचालकांच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. या सभेस संचालक वसंत आडके,राजेंद्र गेंजगे,लक्ष्मण पोवार,भारती सूर्यवंशी,मनीषा पांचाळ,विजय माळी,प्रदीप पाटील,विजय सुतार,नेताजी फराकटे,विलास पिंगळे व प्रभाकर लोखंडे उपस्थित होते.

Friday, 10 February 2023

संजय घोडावत अकॅडमीचे जेईई मेन्स परीक्षेत यश

हेरले / प्रतिनिधी
जेईई मेन्स परीक्षेमध्ये संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी ने घवघवीत यश संपादन केले.अकॅडमीच्या पंधरा विद्यार्थ्यांनी 99 पर्सेंटाइल पेक्षा अधिक गुण मिळवून जेईई सीईटी आणि नीट परीक्षा मधील उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली.
भक्ती पाटील 99.94 तनिष्क चिरमे (99.89 ) हर्षल पाटील (99.79) दुर्वेश गांगण (99.69) आदित्य बोराटे (99.66) स्वातम  दोशी (99.64) विवेककुमार सिंग (99.64) शिवतेज घाटगे (99.55) शंतनू बेनके (99.55) युवराज पवार (99.54) मिहीर सहस्त्रबुद्धे (99.50) वैष्णवी मोरे (99.31) शुभम पाटील (99.20) चारुता कराड (99.14) प्रणव मगदूम (99.9).
 वरील सर्व विद्यार्थ्यांनी 99 पर्सेंटाइल पेक्षा अधिक गुण मिळविल्याबद्दल अकॅडमीचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी संचालक श्रीनिवास (वासू) कोंडूती, यशस्वी विद्यार्थी, पालक यांचे अभिनंदन केले आहे.

Thursday, 9 February 2023

संकल्प निरोगी महाराष्ट्राचा अंतर्गत हेरलेत महाआरोग्य शिबिर संपन्न

२०४ रुग्णांनी घेतला लाभ

हेरले /प्रतिनिधी
 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या वाढदिवसानिमित्त व राज्याचे आरोग्य मंत्री  तानाजी सावंत  यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व गरजू व गरीब रुग्णांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी   प्राथमिक आरोग्य केंद्र हेरले येथे गुरुवारी महाआरोग्य शिबिर संपन्न झाले. 
    दीपप्रज्वलन सरपंच  राहुल शेटे  उपसरपंच बख्तियार जमादार, मुनिर जमादार ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच आरोग्य शिबीराची माहिती वैद्यकीय अधिकारी  डाॅ.राहुल देशमुख  यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थ व रुग्णांना दिली.  सरपंच राहुल शेटे  व अन्य पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. औषध निर्माण अधिकारी  सोनवणे यांनी आभार मानले. 
   शिबिरामध्ये एकूण २० ४रुग्णांनी लाभ घेतला. त्यामध्ये बालरोग व स्त्री रोग तज्ञ डॉ. राहुल देशमुख, ट्युलिप हॉस्पिटल  कडील अस्थिरोग तज्ञ डॉ. दीपक देशपांडे व हृदया हॉस्पिटल कडील जनरल मेडिसिन श्रीनाथ कुलकर्णी यांनी तपासणी करून योग्य तो औषध उपचार दिला.या शिबिरासाठी प्रा.आ. केंद्राकडील आरोग्य सहायक, सहायिका,आरोग्य सेवक, सेविका,  सी एच ओ,  वाहन चालक, परिचर, आशा सेविका गटप्रवर्तक यांचे मोलाचे योगदान लाभले.
  फोटो 
हेरले : येथील आरोग्य शिबीर प्रसंगी वैद्यकीय अधिकारी  डाॅ.राहुल देशमुख मार्गदर्शन करतांना शेजारी उपस्थित सरपंच राहुल शेटे, उपसरपंच बख्तियार जमादार, मुनिर जमादार ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील आदी मान्यवर.

Wednesday, 8 February 2023

संकल्प निरोगी महाराष्ट्राचा अंतर्गत हेरलेत ९ फेब्रुवारी रोजी महाआरोग्य शिबिर


       हेरले /प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन सार्वजनिक सार्वजनिक आरोग्य विभाग जि.प.कोल्हापूर व ट्यूलिप हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र हेरले येथे दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी  १० वाजता महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. 
   या शिबिरामध्ये फिजिशियन, स्त्री रोग तज्ञ ,होमिओपॅथी तसेच आयुर्वेद तज्ञ व अस्थिरोग तज्ञ तज्ञ डॉक्टर मार्फत तपासणी करण्यात येणार आहे .यामध्ये रक्त लघवी- सीबीसी शुगर ,एचआयव्ही हिपॅटीस बी, सिरम कॅल्शियम व थायरॉईड तपासणी, ई.सी.जी. (कार्डिओग्राम ) व इतर जनरल तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तरी याचा लाभ हेरले परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र हेरलेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी केले आहे.
   याचबरोबर महाराष्ट्र शासनाची जागरूक पालक तर सुरक्षित बालक या मोहिमेचे उद्घाटन हेरले सरपंच राहुल शेटे यांच्या हस्ते होणार आहे यामध्ये शून्य ते अठरा वर्षे पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र कार्य कक्षेतील सर्व बालकांची शालेय स्तरावर अंगणवाडी स्तरावर पथकांच्यामार्फत तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत व दुर्धर आजारी मुलांना संदर्भ सेवा दिली जाणार आहे

राष्ट्रीय अबॅकस परीक्षेत उत्कर्ष प्रभुखानोलकर प्रथम

कोल्हापूर/प्रतिनिधी: 

पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत हनुमान नगर कोल्हापूर येथील उत्कर्ष राजाराम प्रभुखानोलकर याने देशात प्रथम क्रमांक मिळविला. सानेगुरुजी वसाहत येथील सांजदीप  अकॅडमीचा विद्यार्थी असलेला उत्कर्ष हा श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर जरगनगर येथे इयत्ता तिसरीत शिकत आहे. त्याने 5.10 मिनिटामध्ये शंभर गणिते सोडवून प्रथम क्रमांकाचे बक्षिस सायकल व आकर्षक ट्रॉफी जिंकली आहे.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा, कर्नाटक, गुजरातसह देशभरातून २२०३ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात सहा देशांमधून ऑनलाइन परीक्षा दिलेल्या काही विद्यार्थ्यांचाही समावेश होता. यामध्ये उत्कर्षने लेवल झिरो विभागामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला, त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
 या स्पर्धेत सांजदीप अकॅडमीच्या २० विद्यार्थांनी विविध लेवलच्या परीक्षेत सहभाग घेतला, त्यामधील तब्बल १६ विद्यार्थी ट्रॉफी विनर ठरले आहे. 'मोस्ट एनर्जेटीक सेंटर' म्हणून यावेळी सांजदीप अकॅडमीचा गौरव करण्यात आला.
 उत्कर्षला सांजदीप अकॅडमीच्या संचालिका सौ. संजना घोदे,  टीचर सौ. अस्मिता बाबर, आई सौ. नूतन प्रभुखानोलकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर जरगनगर विद्यामंदिरच्या वर्गशिक्षिका सौ. निलोफर अत्तार यांचे सहकार्य लाभले.

अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवीनगर करा: प्रा.शंकर पुजारी

कोल्हापूर / प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवीनगर करावे यासाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा.शंकर पुजारी यांनी तत्कालीन प्रभारी मा.जिल्हाधिकारी व सध्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, डॉ. संदीप वाटेगावकर व आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.शंकर पुजारी म्हणाले ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी एक उत्तम शासक व संघटक होत्या. आपल्या असामान्य कर्तृत्वाने त्यांनी  रयतेचे मन जिंकले. त्यांना जीवनकाळात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला. त्या उत्तम राज्यकर्त्या तसेच उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, त्यांचा जीर्णोद्धार केला; त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा यासाठी आम्ही  मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री यांनाही यासंदर्भात निवेदन दिले असून त्याचा पाठपुरावा शासनदरबारी करीत आहोत.
डॉ.संदीप वाटेगावकर म्हणाले ''अहिल्यादेवी यांचा जन्म हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी याठिकाणी शिंदे घराण्यात झाला. त्यांच्या कर्तृत्वाने या जिल्ह्याचे नाव भारतभर नव्हे तर संबंध जगभर पोहचले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची जन्मभूमी असलेल्या या अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यादेवीनगर करण्यात यावे अशी महाराष्ट्रातील सर्वच जातीधर्मातील लोकांची सद्भावना आहे.''

Tuesday, 7 February 2023

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांच्या महामंडळाचा १३ फेब्रुवारी 2023 रोजी महामोर्चा


कोल्हापूर /प्रतिनिधी

  आजवर आपण जे जे काही मिळविले आहे ते संघर्ष, मोर्चे, आंदोलने करूनच मिळविले आहे. सद्यस्थितीत आंदोलन ही काळाची गरज आहे. शिक्षकेत्तरांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर निर्णय मिळविणेसाठी शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने सोमवार दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता शनिवार वाडा ते आयुक्त कार्यालय (सेंट्रल बिल्डींग) पुणे असा भव्य मोर्चा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
   आता कुणाचीही वाट न पाहता आपल्या प्रश्नांसाठी आपणच रस्त्यावर उतरले पाहिजे, आपल्या हक्कासाठीच हा मोर्चा असून प्रचंड संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहून शिक्षकेतरांची ताकद शासनाला दाखवावी. या भव्य मोर्चानंतरही शासनाने आपल्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर ऐन परीक्षांच्या तोंडावर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा महामंडळाचा मानस आहे त्यासाठीही आपणां सर्वांना तयारी ठेवावी लागेल. आपण तर मोर्चात जरूर सामील होणार आहात परंतु आपल्या बरोबर आपल्या जिल्ह्यातील इतरही शिक्षकेत्तर बंधू भगिनी सुध्दा या मोर्चास उपस्थित राहतील याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी. दिनांक १३ फेब्रुवारी २०१३ रोजी राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामुदायिक रजा घेऊन ठिक सकाळी ११ वाजता शनिवार वाडा, पुणे येथे उपस्थित राहावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ कोल्हापूरचे  जिल्हाअध्यक्ष  तथा  महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी
 प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Monday, 6 February 2023

सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहात राहून विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्य घडवावे : दगडू माने


--- हातकणंगले येथे सामाजिक न्याय विभागाच्या मुला व मुलींच्या वसतिगृह यांच्यावतीने स्नेहसंमेलन उत्साहात ; विविध कलाविष्कार सादर

कोल्हापूर / प्रतिनिधी
जीवनात कितीही अडचणी ,संकटे आली तरी  शिक्षणाची संधी सोडू नका. शिक्षणाशिवाय जीवनाला अर्थ नाही. सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे ही गोरगरीब, सर्वसामान्य विध्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारी ज्ञान मंदिरे आहेत. त्यामुळे या वसतिगृहात प्रवेश घेऊन प्रत्येक विध्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्वल करून आई-वडिलांसह गुरुजनांचे नाव उज्वल करावे असे मत शिरोळचे सिनेअभिनेते व प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने यांनी व्यक्त केले.
           हातकणंगले येथे सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह व जयसिंगपूर येथील बीसी-ईबीसी मुलींचे शासकीय वसतिगृह यांच्यावतीने वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रहार चे  जिल्हा उपाध्यक्ष व सिनेअभिनेते
दगडू माने बोलत होते. हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव तोंदले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक वसतिगृहाचे अधीक्षक उत्तम कोळी यांनी केले.
        यावेळी पोलीस निरीक्षक तोंदले म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले संविधान सर्वश्रेष्ठ असून संविधानामुळेच आपण स्वातंत्र्य आहोत.  आपले हक्क आपल्याला समजेल आहेत.  आपण आपल्या न्यायासाठी संघर्ष करू शकतो. त्यामुळे भारतीय संविधान प्रत्येकांनी वाचावे आणि त्याची प्रत आपल्या घरात ठेवावी  असे सांगून त्यांनी वसतिगृहातील विध्यार्थ्यांनी सर्व सुविधांचा लाभ घेऊन  कोल्हापूरचे नाव सर्वदूर पोहचवावे आशा शुभेच्छा  दिल्या. 
         यावेळी पालक प्रतिनिधी सागर जमणे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, सामाजिक न्याय विभागाच्या समता पर्वाच्या निमित्ताने पार पडलेल्या विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या विध्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.  सूत्रसंचालन विध्यार्थी प्रतिनिधी जयदीप कांबळे,अमृता बाबर यांनी केले.  अमर बोरगे यांनी आभार मानले. यावेळी हातकणंगले पोलीस ठाण्याचे संग्राम पाटील, पत्रकार कुणाल कांबळे,कवी संदीप पाटील,अरुण कोळी यासह बिव्हीजी कर्मचारी व क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, वस्तीगृहामधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी
विविध कलाविष्कार सादर केले या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी पालकातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
----------

Sunday, 5 February 2023

चर्मकार समाजाच्या विकास कामासाठी लागणारा निधी मिळवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्नशील राहणार - दलित मित्र डॉ.अशोकराव माने

हेरले / प्रतिनिधी

  हेरले चर्मकार समाजाच्या विकास कामासाठी लागणारा निधी समाजास मिळवून देण्यास शासन दरबारी प्रयत्नशील राहणार असे प्रतिपादन जिल्हा नियोजन कमिटी सदस्य दलित मित्र डॉ. अशोकराव माने यांनी केले. ते हेरले (ता. हातकणंगले) येथील चर्मकार समाज मंदिरामध्ये संत रोहिदास जयंती निमित्त सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
        डॉ. अशोकराव माने पुढे म्हणाले की संत रोहिदास यांनी सामाजिक समतेचा संदेश देऊन सामाजिक समता निर्माण होण्यासाठी कार्य केले. राष्ट्रपुरुषांनी आपल्या स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता समाजासाठी कार्य केले म्हणून समाजाची उन्नती झाली. म्हणून आपण सर्वांनी संताच्या व राष्ट्र पुरुषांच्या विचाराचा वारसा घेऊन समाजासाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहूया. जिल्हा नियोजन कमिटी सदस्य या माध्यमातून चर्मकार समाजास विकास निधी देण्यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहणार असे आश्वासन दिले.
    सरपंच राहुल शेटे म्हणाले समाजामध्ये एकता असल्यास निश्चितच समाज उपयोगी कार्य सर्वांकडून होत असते. हेरले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चर्मकार समाजास विकास निधी व समाजकल्याण विभाग कोल्हापूरच्या माध्यमातून समाजबांधवांना वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे मत व्यक्त केले.
स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुधाकर निर्मळे यांनी केले.
    प्रथमतः दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते संत रोहिदास यांच्या मुर्तीस पुष्पाहार अर्पण करून आर्ती करण्यात आली तसेच त्यांचा सत्कार पोपट जाधव व आनंदा गवळी यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी सरपंच राहूल शेटे ,उपसरपंच महंमदबख्तियार जमादार , ग्रामपंचायत सदस्य राकेश जाधव, विजय भोसले, अमित पाटील, अर्जुन पाटील, मनोज पाटील, हिरालाल कुरणे, श्रीमती उर्मिला कुरणे, सविता पाटील, शुभांगी चौगुले, रंजना माने, वनिता खाबडे आदी नुतन सदस्यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
     याप्रसंगी डॉ. अमोल राजमाने, पापा जाधव, पोपट जाधव, संजय जाधव, गोरखनाथ जाधव, आनंदा गवळी, मारुती जाधव, कुमार जाधव, सचिन जाधव, पिंटू जाधव, प्रमोद जाधव, दीपक सोनवणे, विपुल गवळी, ऋषिकेश जाधव, अनिकेत जाधव, आशिष जाधव, दीपक जाधव, हर्ष जाधव, सुमित जाधव, मंथन जाधव, सतीश जाधव,अभिषेक जाधव, केदार जाधव,अंकुश जाधव,महेश जाधव
संस्कार जाधव,निखिल जाधव
सुजल जाधव,ओंकार जाधव,अभिषेक निर्मळे,शुभम सोनवणे आदी मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येंनी उपस्थित होते.
     फोटो 
हेरले : येथील चर्मकार समाज मंदिरात कार्यक्रम प्रसंगी बोलतांना दलितमित्र 
डॉ. अशोकराव माने बोलतांना शेजारी सरपंच राहुल शेटे, उपसरपंच महंमदबख्तियार जमादार, अमित पाटील, विजय भोसले, अर्जुन पाटील राकेश जाधव व अन्य मान्यवर.

विविध परीक्षेच्या कामात असलेल्या शिक्षकांच्या निवडणूक नियुक्त्या रद्द - आमदार जयंत आसगावकर

 कोल्हापूर / प्रतिनिधी
  कुडित्रे येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकिच्या कामासाठी ज्या ज्या मुख्याध्यापक,शिक्षक व इतर सेवक यांना नियुक्तिचे आदेश दिलेले होते ते सर्व आदेश विविध परीक्षेच्या कारणाने रद्द करण्याचा निर्णय निवडणूक अधिकारी यांनी पत्र देवून घेतल्याची माहिती ,शिक्षक आमदार जयंत 
आसगावकर यांनी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपिठाच्या आज मुख्याध्यापक संघाच्या विदयाभवन येथील सभेत दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी एस.डी. लाड हे होते.
            विविध परीक्षांच्या काळात वरील सहकारी कारखान्याच्या दि. १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकिच्या कामाबाबत कागल, पन्हाळा, करवीर, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यातीला व  कोल्हापूर शहरातील अनेक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक यांना आदेश देण्यात आले होते . दि१२ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षां असल्याने तसेच आगामी इ१०वी व १२ वी बोर्ड परीक्षेची कामे असल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरला होता. शैक्षणिक व्यासपीठाकडे असंख्य तक्रारी आल्या होत्या. या प्रश्नासंबंधी शैक्षणिक व्यासपीठाने शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना भेटून या प्रश्नाची माहिती दिली. त्वरीत आमदारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेवून सदरचे आदेश रद्द करावेत अशी विनंती केली होती.आज विद्या भवन येथे शैक्षणिक व्यासपीठाने सदरच्या निवडणूकीचे आदेश प्राप्त झालेल्या सर्वांची सभा घेण्यात आली. या सभेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा वरील निर्णय आमदारांनी सांगितला .
             सार्वत्रिक निवडणूका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणूकांच्या कामाशिवाय सहकार क्षेत्रातील कोणत्याही निवडणूकीचे काम शिक्षक,  मुख्याध्यापक यांना देवू नये म्हणून फेब्रुवारी महिन्यातच या मागणीसाठी जिल्हयातील सर्व शाळा एक दिवस बंद ठेवून शैक्षणिक व्यासपीठातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय आमदारांनी घोषित केला व त्याला सर्वांनी एकमुखी पाठींबा दिला.
               आजच्या सभेला बी. जी. बोराडे, दादासाहेब लाड, राजाराम वरुटे, बाबा पाटील, इरफान अन्सारी, प्रा.सी. एम. गायकवाड, उदय पाटील, सुधाकर निर्मळे, अरुण मुजुमदार, सुधाकर सावंत, सुदेश जाधव, शिवाजी लोंडे, वर्षा पाटील, विजयमाला सुर्यवंशी आदी प्रमुख पदाधिकारीसह निवडणूक नियुकतीचे आदेश प्राप्त शिक्षक,मुख्याध्यापक उपस्थित होते. आभार मिलींद पांगिरेकर यांनी मानले.
      फोटो
कोल्हापूर : शिक्षक आमदार जयंत आसगावकर  कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपिठाच्या सभेत बोलतांना शेजारी एस.डी.लाड, दादासाहेब लाड,बी. जी. बोराडे, प्रा. सी.एम. गायकवाड, राजाराम वरुटे आदीसह अन्य मान्यवर.

Saturday, 4 February 2023

पंचमहाभूत लोकोत्सव या कार्यक्रमानिमित्य नियोजनासाठी माध्यमिक शिक्षक सहविचार मंचच्या अध्यक्ष आणि सदस्यांची सभा संपन्न

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील शिक्षक सहविचार मंच गटात सहभागी असणाऱ्या सर्व तालुक्यातील शाळांनी आपापल्या सहविचार मंचच्या केंद्र शाळेत आपल्या शाळेत जमा झालेले तुरडाळ, मुग, ताट, वाटी,ग्लास, साडी व  वेस्टेज प्लास्टिक हे साहित्य जमा करावे. सर्व साहित्यांची शाळांनी नोंद स्वतंत्रपणे ठेवावी व याची माध्यमिक शिक्षण विभागाकडे माहिती पाठवावी. प्रमुखांनी  केंद्र शाळामध्ये जमा झालेले सर्व साहित्य केंद्रावरून मठावर देण्यासाठी किती गाड्या लागणार याची माहिती कळवावी म्हणजे गाडीची सोय करता येईल. शाळेतील मुले आपापल्या पालकांच्या बरोबर त्यांच्या जबाबदारीवर कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यास सांगावे. साहित्य घेऊन जाणाऱ्या गाडीवर माध्यमिक शाळेच्या नावाचा फलक लावावा. १० जानेवारी पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये साहित्य गोळा करून  एकत्रित करावे आणि १५ फेब्रुवारी पर्यंत सर्व साहित्य मठामध्ये पोहचविण्यासाठी माध्यमिक शिक्षक सहविचार मंचाने प्रयत्नशील राहावे असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले.
    मुख्याध्यापक संघ कोल्हापूरच्या 
विद्याभवन सभागृहामध्ये सुमंगलम हा पंचमहाभूत लोकोत्सव या कार्यक्रमानिमित्य नियोजनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक सहविचार सभेचे तालुका अध्यक्ष व अंतर्गत सहविचार मंचाच्या मुख्याध्यापकांची सभा आयोजित केली होती या प्रसंगी बोलत होते. या सभेस कोल्हापूर जिल्हयातील बारा तालुक्याचे सहविचार सभेचे तालुका अध्यक्ष व तालुका अंतर्गत सहविचार सभेचे सदस्य मुख्याध्यापक उपस्थित होते. स्वागत उपशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे यांनी केले.
      माध्यमिक शिक्षक सहविचार मंच 
कागल तालुका अध्यक्ष ए. आर. खामकर ७ सहविचार मंच , करवीर तालुका अध्यक्ष पी. टी. पाटील १० सहविचार मंच, भुदरगड तालुकाअध्यक्ष डी. एस. देसाई ४ सहविचार मंच , राधानगरी तालुका अध्यक्ष एस. के. पाटील ६ सहविचार मंच, हातकणंगले तालुका अध्यक्ष बी. डी. शिंदे १६ सहविचार मंच, पन्हाळा तालुका अध्यक्ष एस. आर. पाटील १० सहविचार मंच, शाहुवाडी तालुका अध्यक्ष दीपक लाड ६ सहविचार मंच, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष राजेंद्र खोराटे १० सहविचार मंच,
आजरा तालुका अध्यक्ष एस. एस. देवेकर ३ सहविचार मंच , शिरोळ तालुका अध्यक्षा आर. आर. निर्मळे ६ सहविचार मंच, कोल्हापूर शहर अध्यक्ष बी. सी. वस्त्रत ९ सहविचार मंच,चंदगड तालुका अध्यक्ष विश्वास पाटील ९ सहविचार मंच,गगनबावडा तालुका अध्यक्ष व्ही. डी. पाटील १ सहविचार मंच आदी सहविचार मंचांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
     या सभेस शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघ चेअरमन सुरेश संकपाळ, खंडेराव जगदाळे,उपशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अजय पाटील, पुनम ठमके, बाबासाहेब पाटील, मुख्याध्यापक अर्जुन होणगेकर, सुधाकर निर्मळे,इरफान अन्सारी, मुख्याध्यापिका वंदना डेळेकर, काकासाहेब भोकरे,मिलींद बारवडे, के. के. पाटील, आर.वाय. पाटील, के. एस. पाटील,मिलींद पांगिरेकर, व्ही. जी. पोवार,अरुण मुजुमदार, जगदीश शिर्के आदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनाचे अध्यक्ष / सचिवसह सहविचार मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.

Friday, 3 February 2023

वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटी यांच्याकडून अन्वीला यंगेस्ट माऊंटनर हा किताब प्रदान

कोल्हापूर / प्रतिनिधी
 कुमारी अन्वी चेतन घाटगे हिने वयाच्या 2 वर्षे 11 महिन्याची असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे सर केल्याने तिचे  नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड  मध्ये तिच्या नावाची नोंद झालेली आहे.ती कसळसूबाई शिखर सर करणारी देशातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे.
त्याचप्रमाणे तिच्या ह्या कामगिरीची वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटी ने दखल घेऊन 8 जानेवारी रोजी "YOUNGEST MOUNTAINEER "हा किताब देणार असल्याची घोषणा केली होती.कम्युनिटीची टीम  कोल्हापुरात अलेली होती.
   मेरी वेदर ग्राउंडवर आयोजीत कार्यक्रमामध्ये खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते तसेच वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटी चे अध्यक्ष  यशवंत राऊत यांचे कडून कु.अन्वी हिला ट्रॉफी, सर्टिफिकेट , टी-शर्ट,देऊन एंगेस्ट माऊंटनर हा किताब देऊन सन्मानित केले.
  अन्वीने वयाच्या 2 ऱ्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई भर पावसात अवघ्या 3 तासात चढाई करत जागतिक विक्रम नोंदविला आहे. अतिशय लहान वयामध्ये मोठ्या स्वप्नांची चढाई करण्याचा ध्यास घेणाऱ्या अन्वीचा आम्हास सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. तिच्या कर्तृत्वास मानाचा सलाम आहे.असे उद्गगार खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यक्रमाच्या वेळी काढले.
   यावेळी कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, प्राचार्य शाहू कॉलेज डॉ. विलास किल्लेदार विविध कॉलेजचे प्राचार्य ,पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक,अन्वीची आई अनिता घाटगे,वडील चेतन घाटगे,हे उपस्थित होते.
    फोटो 
खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते तसेच वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे अध्यक्ष  यशवंत राऊत यांचे कडून कु.अन्वी हिला ट्रॉफी, सर्टिफिकेट , टी-शर्ट,देऊन एंगेस्ट माऊंटनर हा किताब देऊन सन्मानित करताना शेजारी आई अनितासह  वडील चेतन घाटगे

अशोकराव माने तंत्रनिकेतन वाठार तर्फ वडगाव येथे सुवर्ण महोत्सवी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर

कोल्हापूर / प्रतिनिधी
श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप संचलित अशोकराव माने पॉलिटेक्निक वाठार तर्फ वडगाव येथे सोमवार दिनांक ६-२-२०२३ ते बुधवार दिनांक ८-२-२०२३ पर्यंत जिल्हा परिषद शिक्षण विभाग, कोल्हापूर यांचे मार्फत सुवर्ण महोत्सवी जिल्हास्तरीय भव्य विज्ञान प्रदर्शन आणि ग्रंथ प्रदर्शन याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.
   जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाअंतर्गत सोमवार दिनांक ६ २- २०२३ रोजी १ वाजून ३० मिनिटांनी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन व दुपारी २ वाजता विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. मंगळवार दिनांक ७-२-२०२३ रोजी सहा गटातील स्पर्धकांच्या प्रदर्शनाचे निरीक्षण आणि मूल्यमापन होणार असून सकाळी १० ते १ या सत्रात *संशोधक घडताना' या विषयावर डॉ. श्रेयश मानगावे (आयशर पुणे) यांचे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील विज्ञान विषय शिक्षकांसाठी श्री. अ. ल. देशमुख (भारती विद्यापीठ पुणे) यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' व 'विज्ञान शिक्षण' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.

सदर कार्यक्रमाचा समारोप बुधवार दिनांक ८-२-२०२३ रोजी दुपारी ३ वाजता पारितोषिक वितरण समारंभासोबत संपन्न होईल तरी सदर शैक्षणिक उपक्रमाचा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी श्री. एकनाथ आंबोकर व अशोकराव माने पॉलिटेक्निक वाठार चे प्राचार्य श्री. वाय. आर. गुरव यांनी केले आहे.

कुंभी कासारी निवडणुकीच्या कामकाजाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची उद्या बैठक


कोल्हापूर / प्रतिनिधी
 कुंभी कासारी सहकारी साखर 
कारखाण्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या  कामकाजाबाबत नेमणूक झालेल्या शिक्षकांची बैठक उद्या घेण्यात येणार आहे. जुनी पेन्शन सर्वांना मिळावी, शिक्षक भरती बंदी त्वरीत उठवावी, कायम विना अनुदानित शाळांचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवावेत तसेच सार्वत्रिक निवडणुका शिवाय अन्य निवडणुकांचे कामे शिक्षकांना देऊ नयेत या मागण्यांसाठी लवकरच शैक्षणिक व्यासपीठातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढूया असा निर्णय आमदार जयंत आसगावकर यांनी सभेत जाहीर केला. विद्याभवन येथील सभेस अध्यक्षस्थानी एस डी लाड होते.
   कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार असून त्यासाठी कागल, करवीर, शाहूवाडी, राधानगरी तसेच कोल्हापूर शहरातील अनेक शिक्षकांना निवडणूक कार्याचे आदेश दिलेले आहेत.  नजीकच्या काळात इयत्ता दहावी, बारावी बोर्ड व शिष्यवृत्ती परीक्षा आदी कामांमध्ये शिक्षक गुंतणार आहेत. निवडणुक कामकाजाबाबत शनिवार दि. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता विद्याभवन कोल्हापूर येथे या कामासाठी ज्यांची नियुक्ती झाली आहे त्यांची सभा घेण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी न चुकता वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष एस.डी. लाड यांनी केले.

     या सभेस शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन सुरेश संकपाळ, खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील, प्रा. सी. एम. गायकवाड, 
व्ही. जी. पोवार, सुधाकर निर्मळे, काकासाहेब भोकरे, मिलिंद बारवडे, शिवाजी माळकर, सुधाकर सावंत, इरफान अन्सारी, के. के. पाटील, आर. वाय. पाटील, मिलींद पांगिरेकर, संदीप पाथरे, उमेश देसाई, अरुण मुजुमदार, विजयमाला सुर्यवंशी, जगदीश शिर्के, वर्षा पाटील,आदी प्रमुखासह शिक्षक शिक्षकेत्तर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो 
शिक्षक आमदार जयंत आसगावकर बोलतांना शेजारी एस. डी. लाड दादासाहेब लाड, सुरेश संकपाळ, बाबासाहेब पाटील प्रा. सी.एम. गायकवाड व अन्य मान्यवर.