हेरले /प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायत अंतर्गत (हेरले ता. हातकणंगले) येथे प्रत्येक कुटुंबापर्यंत स्वच्छतेचे महत्व पटवण्यासाठी स्वच्छतेबाबत अधिक जनजागृती करून स्वच्छतेची चळवळ उभी राहण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार एक तारीख एक घंटा असा उपक्रम स्वच्छता व श्रमदान करून राबविण्यात आला.
२ ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे जे औचित्य साधून जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ च्या कालावधीत स्वच्छता ही सेवा २०२३ अभियान राबविण्यात येत आहे यानिमित्त ग्रामपंचायत हेरले येथे लोकसभागातून एक तास श्रमदान द्वारे स्वच्छता करण्यात आली यामध्ये ग्रामपंचायत हेरले परिसर प्राथमिक शाळा परिसर प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र गोमटेश्वर टाकी परिसर बाजारपेठ धार्मिक स्थळे या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली
यावेळी सरपंच राहुल शेटे,उपसरपंच बक्तीयार जमादार, ग्रामविकास अधिकारी बी एस कांबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी महिला बचत गट, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, विद्यार्थी स्वयंसेवी संस्था नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.