डॉ अजितकुमार पाटील, सर ( पीएच डी कोल्हापूर )
२ ऑक्टोबर १८६९ रोजी जगातील सर्वात लोकप्रिय स्वातंत्र्यसैनिक म्हणजेच महात्मा गांधी यांचा जन्म झाला. ‘शब्दांमध्ये वाईटाचे चांगल्यामध्ये रूपांतर करण्याची शक्ती असते’,असा विश्वास बाळगणार्या गांधींनी जगाला अहिंसेची शिकवण दिली. जे काम कोणत्याही शस्त्राने करता येत नाही ते काम कायदा, नैतिक मूल्ये आणि नैतिकतेने होऊ शकते असे त्यांनी नेहमी सगळ्यांना संगितले.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींनी महत्त्वाचे योगदान दिले. यामुळेच त्यांना 'राष्ट्रपिता' म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी त्यांची जयंती भारतात मोठ्या थाटात साजरी केली जाते. भारताव्यतिरिक्त, हा दिवस जगभरात 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणूनही साजरा केला जातो, कारण त्यांना अहिंसावादी स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखले जाते.
“स्वच्छतेचे मंत्र ध्यानी धरा,
आरोग्य आपले निरोगी करा”
घर हे आपलं असत आणि परिसर हा दुसऱ्याचा असतो. या विचारामुळेच मानवाने निसर्गाचा ऱ्हास केला. स्वच्छता ठेवणे हे फक्त सरकारचे काम नाही आहे तर प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.
स्वच्छता ठेवणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. म्हणून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतेची आवड असली पाहिजे. आपल्या भारत देशाला स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व लोकांना पुढाकार घेण्याची गरज आहे.
हे काम फक्त सरकारच करू शकत नाही तर लोकांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. या भारत देशाला स्वच्छ भारत बनविण्यास आपले योगदान दिले पाहिजे.
महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कोणी केली केली.
महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कधी केली होती?
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात महात्मा गांधी जयंती निमित्त २ ऑक्टोबर, २०१४ साली केली होती.
महात्मा गांधींच्या गुणधर्मांबद्दल बोलताना, त्यांचे संत वागणे हे त्यांच्या वैशिष्ट्यातले खूप मोठे वैशिष्ट्य होते. माझ्या मते, जेव्हा मी महात्मा गांधींच्या जीवनाबद्दल वाचले तेव्हा मला आढळले की त्यांनी खरोखरच स्वतःवर विजय मिळवला होता.
सत्यप्रेमी – सत्यनिष्ठा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अनुचित गोष्टींकडे लक्ष दिले नाही. नेहमी लोकांना सत्याच्या मार्गावर जाण्यास सांगायचे आणि स्वतःचे अनुसरण करायचे
मनापासून – त्यांच्या मनात फसवणुकीची भावना नव्हती आणि ते कोणाशी वाईट विचारांनी वागले नाहीत. त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली.
आज स्वच्छ भारताची मोहीम महात्मा गांधींच्या नावाने चालवली जात आहे कारण ते खूप स्वच्छता प्रेमी होते आणि स्वच्छ्ता ठेवत असत. आणि त्यांनीच हरि जन सुरू केला. अशा प्रकारे, महात्मा गांधींची अनेक वैशिष्ट्ये होती.
आपल्या देशाचे राष्ट्रपिता, आदर्शवादी व्यक्ती, बापू म्हणून प्रसिद्ध असलेले गांधी यांना सर्वोत्तम समाजसुधारक देखील मानले जाते.गांधीजींनी आयुष्यभर सामाजिक सुधारणेला प्रोत्साहन दिले आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. बापूंनी देशाच्या स्वातंत्र्यात महत्वाची भूमिका बजावली.
जय हिंद....