महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना शाखा शहर कोल्हापूर मार्फत महम्मद पैगंबर जयंती निमित्त उर्दू वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धे मध्ये महानगरपालिकेच्या 5 शाळांमधील 30 विद्यार्थी सहभागी झाले होते.
डायटचे प्राचार्य डॉ आय सी शेख साहेब,प्रशासनाधिकारी एस. के.यादव व मनपा राज्य प्रमुख सुधाकर सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी सुधाकर सावंत यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य प्रमुख पदी निवड झाले बद्दल नुरुद्दीन पटेल,फारूक डबीर व शकील भेंड़वाड़े यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देवून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना अमीन मुल्ला होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक उमर जमादार यांनी केले.सूत्रसंचालन वसीम शेख व आसिया देसाई यांनी केले.आभार जलील शेख यांनी मानले या सर्व स्पर्धेचे संयोजन अजीम शेख ,रफीक पटेल व आसमा सय्यद यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणुन मुफ्ती आसिफ मौलाना मुआज व मौलाना नियाज यांनी काम पाहिले
वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी
*लहान गट*
1) फातिमा तबरेज काझी
( मनपा एस.ए जमादार उर्दू स्कूल कोल्हापूर)
इयत्ता: 3री
विषय:मोहम्मद स्वल्लल्लाहू अलैही व सल्लम के अखलाक व आदात
मार्गदर्शक शिक्षिका: उजमा नाहीद मैनूद्दीन पिरजादे
2) मरियम तबरेज काझी
( मनपा एस.ए जमादार उर्दू स्कूल कोल्हापूर)
विषय: सिरतुन्नबी
इयत्ता: 5वी
मार्गदर्शक शिक्षिका: उजमा नाहीद मैनूद्दीन पिरजादे
3) ऐमन समीर बागवान
( मनपा एस.ए जमादार उर्दू स्कूल कोल्हापूर)
विषय:
मोहम्मद्व स्वल्लल्लाहू अलैही व सल्लम के मोजतात
इयत्ता: 5वी
मार्गदर्शक शिक्षिका: निलोफर समीर बागवान
*मोठा गट*
1) सना अब्दुल सय्यद
( मनपा छ.रा.महाराज उर्दू स्कूल कोल्हापूर)
विषय: सिरतन नबी मोहम्मद सल्ल. पर आनेवाले हालात
इयत्ता: 7वी
मार्गदर्शक शिक्षक: असिम बाबर पटेल
2) तस्मिया राजू इनामदार
( मनपा हाजी वंटमुरे उर्दू स्कूल विक्रमनगर कोल्हापूर)
विषय: आप स्वल्लल्लाहू अलैही व सल्लम की पैदाइश, आपका बचपन
सिरतन नबी मोहम्मद सल्ल. पर आनेवाले हालात.
इयत्ता: 8वी
मार्गदर्शक शिक्षक: मेहदीमियाॅ अ.नबी कालेकाजी
3) उम्मेहनी आयुब मुजावर
( मनपा एस.ए जमादार उर्दू स्कूल कोल्हापूर)
विषय: मोहम्मद्व स्वल्लल्लाहू अलैही व सल्लम सिरत
इयत्ता: 7वी
मार्गदर्शक शिक्षिका: आसिया कौसर हुसेन देसाई