कोल्हापूर / प्रतिनिधी
महालक्ष्मी हायस्कूल सावर्डे येथे संपन्न झालेल्या कागल तालुकास्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेत कबड्डी या सांघिक क्रीडा प्रकारात मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड च्या 14 व 17 वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला या दोन्ही संघांची पेठवडगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
14 वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघामध्ये केदार पाटील, जय शिंदे, समर्थ सुतार, सार्थक कांबळे ,प्रथमेश पाटील, हर्षवर्धन पाटील, रणवीर कांबळे, विपिन मोरे, कार्तिक अनुसे, प्रेमराज कापडे, हर्षवर्धन शिंदे, अनुराग खराडे यांचा समावेश आहे. तर 17 वर्षा खालील मुलांच्या कबड्डी संघा मध्ये रोहन कुंभार, प्रमोद कुराडे, अनिकेत पाटील, आदित्य आसवले, उन्मेश गुरव, प्रणव खांडेकर,यश कळमकर, स्वप्नील भांडवले, सुमित शिंदे,समीर देसाई, सार्थक भारमल प्रेम येजरे.या खेळाडूंचा समावेश आहे.
या खेळाडूंना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानी देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन मंजिरी देसाई मोरे ,पेट्रन कौन्सिल मेंबर युवा नेते दौलतराव देसाई ,कोजिमाशीचे अध्यक्ष बाळ डेळेकर ,प्राचार्य एस. आर. पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक एस .बी. सुर्यवंशी, पर्यवेक्षक एस. डी. साठे,पी.बी.लोकरे यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक संभाजी कळंत्रे, अनिल पाटील ,महादेव खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो...
मुरगुड.. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडू समवेत प्राचार्य एस. आर. पाटील, उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी, उपप्राचार्य एस .पी. पाटील, पर्यवेक्षक यासाठी क्रीडा शिक्षक एस. एस. कळंत्रे आदी मान्यवर.