कोल्हापूर दि. 12 -
महानगरपालिकेकडे अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता महापालिकेसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत येणार आहेत. प्रलंबित प्रश्ना बाबत अनेक वेळेला पाठपुरावा करूनही अद्याप मार्गी लागलेले नाहीत. 2005 नंतर नोकरीस लागलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची एन पी एस मध्ये खाती काढलेली नाहीत. काही कर्मचारी- शिक्षक यांची सेवानिवृत्ती जवळ आलेली आहे. त्यांना कोणत्याच पेन्शनचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ही खाती त्वरित काढावीत ,शैक्षणिक पर्यवेक्षक ,मुख्याध्यापक, विषय शिक्षक यांच्या रिक्त जागा भराव्यात, वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, शिक्षक व कर्मचाऱ्यांची स्थायित्व प्रमाणपत्रे द्यावीत ,सहाव्या वेतन आयोगातील व सातव्या वेतन आयोगातील फरक रक्कमा द्याव्यात, शिक्षण समितीकडील जे सेवक महानगरपालिकेकडे कार्यरत आहेत त्यांना शिक्षण समितीकडे परत पाठवावे , विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी, प्रलंबित असलेला आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम घ्यावा इत्यादी मागण्यासाठी हे आंदोलन असून सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी रजा काढून या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक समितीचे नपा/ मनपा राज्य प्रमुख सुधाकर सावंत ,राज्यप्रतिनिधी उमेश देसाई ,शहराध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस संजय कडगावे, वसंत आडके, सुभाष धादवड,उत्तम कुंभार, अशालता कांजर ,नयना बडकस,फारुक डबीर,शकील भेंडवडे,युवराज सरनाईक, विनोदकुमार भोंग,उमर जमादार,मयूर जाधव, संदीप जाधव आदींनी केले आहे.