पेठवडगांव / प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी संस्था आणखी काही विद्याशाखा चालू करत आहे. त्यामध्ये लॉ कॉलेज, फार्मसी कॉलेज इत्यादी विद्या शाखेंचा समावेश असेल. वडगाव विद्यालय सारख्या जुन्या व नामांकित शाळेमध्ये दर्जेदार शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा ओघ कायमस्वरूपी चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेकडून जे जे प्रयत्न करता येतील ते आम्ही करू अशी ग्वाही चेअरमन डॉ.मंजिरी मोरे देसाई यांनी दिली. स्वतः दांडिया खेळून विद्यार्थ्यांना दांडिया खेळण्यास प्रवृत्त केले. सर्व शाळेची पाहणी करून ज्या काही सोयीसुविधा करता येतील हे पाहिले.संस्थेच्या चेअरमन मंजिरी मोरे देसाई यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचे तोंड भरून कौतुक केले.
श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन व वडगाव विद्यालय ज्युनियर कॉलेज वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या चेअरमन डॉ.मंजिरी अजित मोरे देसाई यांनी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत तीन क्रमांक काढले. यामध्ये प्रथम क्रमांक इयत्ता दहावीच्या महालक्ष्मी ग्रुपने पटकावला. द्वितीय क्रमांक इयत्ता आठवी व नववीच्या रॉयल ग्रुपने पटकावला. तसेच इयत्ता दहावीच्या डायमंड ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. आर. आर. पाटील यांनी तर आभार ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. पी. एस. मोहिते यांनी मानले. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे कौन्सिल सदस्य कोजिमाशी पतसंस्थेचे चेअरमन तथा प्राचार्य लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे ,पर्यवेक्षिका सौ आर. आर. पाटील ,संस्थेचे मुख्य लिपिक के. बी. वाघमोडे, तंत्र विभाग प्रमुख ए. एस. आंबी, परीक्षा विभाग प्रमुख डी. ए. शेळके, अतुल पाटील ,ज्येष्ठ शिक्षक डी. एस. कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एस. ए. पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे छायाचित्रण डी. एस. कुंभार व सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रमाला माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज विभागातील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. परीक्षक म्हणून सौ. एस. एस. चव्हाण व सौ यु .सी.पाखरे यांनी काम पाहिले.
फोटो
वडगाव विद्यालय ज्युनियर कॉलेज वडगावमध्ये बोलतांना चेअरमन डॉ. मंजिरी अजित मोरे देसाई , प्राचार्य बाळ डेळेकर व अन्य मान्यवर