हेरले (ता. हातकणंगले) येथील ग्रामसभा मध्ये हात उंचावून मतदान घेऊन सरपंच राहुल शेटे यांनी अमरसिंह वड्ड यांची तंटा मुक्त समिती अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली.
या सभेमध्ये माजी सभापती राजेश पाटील, अशोक मुंडे ,राजगोंड पाटील,मुनिर जमादार,उदय वडड,सयाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हेरले गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी अमरसिह वडड यांची आवाजी मतदानाने निवड करण्यात आली.
आज सकाळी ११ वाजता प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये सरपंच राहुल शेटे यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली.तंटा मुक्त समिती अध्यक्षपदासाठी चार जण इच्छुक होते.यापैकी मुनीर जमादार यांनी माघार घेतली.तर मंगेश काशिद,विनोद वड्ड,अमरसिंह वड्ड यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.यावेळी तिन्ही उमेदवारांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच राहुल शेटे,उपसरपंच बख्तियार जमादार व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले.पण पहिल्यादा प्रत्येक उमेदवार मीच अध्यक्ष होणार या मागणीवर ठाम राहिल्याने त्यांच्या समर्थकांनी आपल्या नेतृत्वाचीच निवड व्हावी यासाठी आक्रमक झाले.यामध्ये यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची चिन्हे निर्माण झाल्यामुळे उपसरपंचासह दहा ग्रामपंचायत सदस्यांनी ही ग्रामसभा तहकूब करावी असे लेखी निवेदन सरपंचांना दिले.व दहा सदस्य तिथून निघून गेले. दरम्यान घटनास्थळी हातकणगले पोलिस निरीक्षक महादेव तोंदले फौजफाट्यासह दाखल झाले.त्यांनी ही ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.पण समर्थकांचा गोंधळ सुरूच होता.या प्रसंगी सरपंच राहुल शेटे यांनी तिन्ही उमेदवारांच्या समर्थकांना हात उंचावून मतदान करावे असे सांगितले.यावर उमेदवार मंगेश काशीद व विनोद वड्ड यांनी आक्षेप घेऊन गुप्त मतदान पद्धतीने सदरची निवड करावी असे सांगितले . सरपंच राहुल शेटे यांनी हात उंचावून मतदान घेतले यामध्ये अमरसिंह वड्ड यांना हात उंचावून समर्थकांनी मोठ्या प्रमाणात समर्थन दर्शविल्याने त्यांची तंटा मुक्त समिती अध्यक्षपदी निवड सरपंच राहुल शेटे यांनी जाहीर केली.