कोल्हापूर / प्रतिनिधी
करवीर तालुका शालेय शासकीय क्रिकेट स्पर्धेत विबग्योर हायस्कूल उचगावने विजेतेपद मिळवले तर संत शांती प्रकाश हायस्कूल गांधीनगरला उपविजेतेपद मिळाले . अशी माहिती प्रसिध्दीस क्रीडा समन्वयक संदीप पाथरे यांनी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ शिये संचलित शिये हायस्कूल जुनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गाडवे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कृष्णात बसागरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धा मेरी वेदर मैदानावर सुरू आहेत .
या सामन्याचा पहिला उपांत्य सामना विबग्योर स्कूल व गांधीनगर हायस्कूल यांच्यामध्ये खेळण्यात आला .गांधीनगर हायस्कूलने प्रथम फलंदाजी करताना सहा षटकात 20 धावा केल्या तर हे आव्हान विबग्योरने दोन षटकात पूर्ण करून विजयी झाले. दुसरा उपांत्य सामना संत शांती प्रकाश हायस्कूल गांधीनगर विरुद्ध अल्फोंसा स्कूल यांच्या मध्ये झाला.अल्फोंसा संघाने सहा षटकात सहा पाच 47 धावा केल्या तर शांति प्रकाश हायस्कूलने हे आव्हान चार षटकात पूर्ण केले .फायनलचा सामना विबग्योर हायस्कूल उचगाव विरुद्ध संत शांती प्रकाश हायस्कूल गांधीनगर यांच्यामध्ये झाला .प्रथम फलंदाजी विबग्योर स्कूलने केली. त्याने सहा षटकात 52 धावा केल्या. संत शांती प्रकाश हायस्कूल गांधीनगरने 6 षटकात 42 धावा करता आल्या. विबग्योर हायस्कूल 10 धावांनी विजयी झाले. या स्पर्धेचे नियोजन क्रीडा समन्वयक संदीप पाथरे यांनी केले .पंच म्हणून शिवाजी कामते, आर.बी. पाटील, संतोष घाटगे, संदीप खुटाळे यांनी केले.
फोटो ओळी:
करवीर तालुका शालेय शासकीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नवजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गाडवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक कृष्णात बसागरे. क्रीडा समन्वयक संदीप पाथरे, आर.बी.पाटील