वाळवा.अजय अहीर
इस्लामपूर येथे तहसील कार्यालयसमोर वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकारच्या विरोधात टाळ मोर्चा काढण्यात आला.महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे काढले पण अजूनही सरकारला जाग आली नाही अजूनही समाजाला मराठा आरक्षण मिळाले नाही.व धनगर आरक्षण, मुस्लीम आरक्षण मिळावे यासाठी मोर्चा काढण्यात आला. आजची तरुण पिढी व मुले हे बेरोजगार झाली आहेत . गुन्हेगारीकडे वळाली आहेत.मुलांना काम मिळाले पाहिजे. आत्महत्या करत आहे. अशा विविध विषयांवर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सरकारचे जाहीर निषेध करण्यात आला.