राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निम्मित भाषण स्पर्धा संपन्न....
*कसबा बावडा,दि.२ ऑगस्ट २०१८:*
कसबा बावडा परिसरातील उपक्रमशील शाळा मनपा. राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ च्या वतीने पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नाही तर कामगार व दिन दलितांच्या हातावर तरलेली आहे अशी भीमगर्जना करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मिळणारच ! अशी डरकाळी फोडणारे स्वराज्य नायक लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शाळेमध्ये भाषण स्पर्धेचे आयोजन करणेत आले होते.
प्रथमतः प्रमुख पाहुण्या ताहीरा मुजावर यांच्या उपस्थितीत दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला जेष्ठ शिक्षिका सुजाता आवटी मॅडम व मा.सौ.मंगल मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करणेत आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी अध्यक्षीय भाषण करताना विद्यार्थ्यांनी केवळ महापुरुषाच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या न करता अशा उपक्रमातून महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करावे..."असा बहुमोल संदेश त्यांनी दिला.
त्यानंतर भाषण स्पर्धेचे उदघाटन कवेत आले भाषण स्पर्धेत जवळपास 30 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.त्यात मुलांनी मराठी इंग्रजी हिंदी आदी भाषांतून आपले भाषण सादर केले.त्यात यशराज घाडगे,संध्या चौगले,दिशा कांबळे,आदिती बिरंजे,प्रणव शिंदे,अस्मिता लोंढे,केदार चौगले,निखिल सुतार,जान्हवी कोरवी,वेदांतीका पाटील,कादंबरी चौगुले,चिन्मय पोवार,समर्थ कांबळे,तनिष्का पाटील,हेमंत कोरवी,आशिषा गायकवाड, निशिका शिंदे,ऋतुराज कोरवी,स्मृती चौगुले,प्रतिभा कोरवी,रसिका माळी, मृणाली दाभाडे, बापू गाढवे,अनुष्का साठे आदी मुलांनी आपली दर्जेदार भाषणे सादर केली. त्यात लहान गटात कादंबरी चौगुले हिने तर मोठ्या गटात मयुरी कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावले.
यावेळी मुख्याध्यापक अजितकुमार पाटील, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे ,उपाध्यक्षा पल्लवी पाटील व सदस्य, जेष्ठ शिक्षक सुशील जाधव,सुजाता आवटी,उत्तम कुंभार,शिवशंभू गाटे सर ,सेवक हेमंतकुमार पाटोळे ,मंगल मोरे व इतर शिक्षक महिला पालक व आजी माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या वेळी मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी " छोटी बालके हीच खरी देशाची व समाजाची संपत्ती आहे.
'मुलीचे व बालकांचे शिक्षण हेच खरे प्रगतीचे लक्षण'
ह्या घोषणेचा जयघोष करून प्रगतीचा मूलमंत्र दिला व कार्यक्रमाची सांगता झाली.
1 comments:
Write commentsVery very good
Reply