सिध्दनेर्ली दि 8 रविंद्र पाटील.
मानव हायस्कुल ,शेंडुर येथील मुलींना *वयात येताना होणारे शरिरीक व मानसिक बदल, मासिक पाळी व्यवस्थापन, सॅनिटरी नॅपकीनचा वापर* या विषयावर अविरत संस्थेमार्फत सौ सुप्रिया पाटील चौगले यांनी मोफत मार्गदर्शन केले यावेळी बोलताना सौ सुप्रिया पाटील चौगले पुढे म्हणाल्या आपल्या समाजात मासिक पाळीला अपवित्र मानलं जातं. या दरम्यान महिलांना घराच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा घराबाहेरच्या खोलीत बसवलं जातं. या दरम्यान महिलांना अपवित्र मानलं जातं. महिलांना स्वयंपाक घरात प्रवेश नसतो, कुणाशी गप्पा मरायलाही स्वतःच्या घरात येता येत नाही.
हे फक्त गरीब कुटूंबांमध्ये नाही तर पैश्याने श्रीमंत व सगळ्या जातींमध्ये ही 'प्रथा' दिसून येते.मासिक पाळी हा स्त्रीयांच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल आहे. मासिक पाळी पुर्णता नैसर्गिक क्रिया आहे.मासिक पाळी स्त्री ला स्त्रीत्वाची जाणीव करुन देते. याच मासिक पाळी बाबत अनेक गैरसमज आहे, त्यामुळे पाळी दरम्यान योग्य काळजी घेतली जात नाही.अविरत ग्रामीण विकास प्रतिष्ठानकडुन सौ.सुप्रिया पाटील व सहकारी मासिक पाळी व्यवस्थापन, स्वच्छता, मासिक पाळी एक वरदान याबाबत जनजाग्रती करतात.विविध खेळ, चर्चा, video,पोस्टर या माध्यमातुन मुली व महिलांना हा विषय समजावुन सांगितला जातो. संस्थेमार्फत कागल व करविर भागातील विविध शाळांमध्ये व महिलांसाठी कार्यक्रम झाले आहेत.
.या वेळी शाळेतील श्रीमती. इंगळे मँडम यांचेसह विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या