समाजातील वंचित घटकांचे आपण काही देणे लागतो व सक्षम महिलांनी गरजु महिलांसाठी महिला क्लबच्या माध्यमातून पुढे यावे यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात वुई क्लब ऑफ रणरागिनी या संघटनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
कोल्हापूर कसबा बावडा येथील श्रीराम मंगल कार्यालयात उपवन वर्तकनगर जिल्हा ठाणे संचलित वुमन इप्टॉमी (Women Epitome) अर्थात वुई क्लब अॉफ रणरागिनी कोल्हापूर शाखेचा शानदार उद्घाटन समारंभ पार पडला.
या कार्यक्रमप्रसंगी क्लबच्या संस्थापिका श्रीमती सविता नायक, मुख्य आमंत्रित श्रीमती माला शेट्टी, विस्तार अधिकारी श्रीमती अनुपमा पाटील उपस्थित होत्या.
वुई क्लब अॉफ रणरागिनी कोल्हापूरच्या नुतन अध्यक्ष पदी सविता पाटील, सचिवपदी श्वेता शिर्के, खजिनदार पदी सुरेखा परब यांची निवड करण्यात आली.
समाजातील गरजू असाह्य महिलांचा विकास व पिडीत महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी हा क्लब कार्य करणार आहे. समाजातील महिला वर्गाला संंघटीत करुन महिला विकास व सबलीकरण हे ब्रिद घेवून वुई क्लब अॉफ रणरागिनी ची वाटचाल असणार आहे.
1 comments:
Write commentsखूप सुंदर वृत्तांकन
Reply