आजकाल वीजेचा वापर खूप वाढला आहे, कारण बाजारात येणारे प्रत्येक तीसरे उपकरण वीजेवर चालते. वीज म्हणताच मला नेहमी "इलेक्ट्रिकल सेफ्टी" आपसुकच आठवते.
एक छोटीशी चूक वीजेच्या बाबतीत कधी ही "जीवघेणी बनू" शकते. 33 वर्षे वीज मंडलात नोकरी करून अंतहीन एक्सीडेंट पाहिलेत. प्रत्येक एक्सीडेंट ने आम्हाला बरेच काही शिकविले. वीज मंडळात इलेक्ट्रिकल एक्सीडेंट्स टाळायला बरीच व्यवस्था असते, तसे घरातल्या बाबतीत नसते. ह्या भूमिकेवर आता खालील लेख वाचा आणि शेअर करा.
प्रत्येक वीज व्यवस्थे मध्ये लीकेज करेंट पासून वाचवायला अर्थिंग ची व्यवस्था असते. प्रत्येक घरी वायरिंग मध्ये थ्री पिन लावलेली दिसते. त्यात मधोमध वरच्या बाजूला एक मोठे पिन अर्थिंग साठी असते. खाली डावी कड़े फेज आणि उजवी कड़े न्यूट्रल असायला हवे. घराची / दुकानाची /लघु उद्योगा ची वायरिंग तेव्हाच तपासली जाते ,जेव्हा एकाधी जीव हानि होते. तेव्हाच कळते कि वायरिंग मधील अर्थिंग तुटलेली किंवा अनुपलब्ध आहे. ही अर्थिंग किती महत्वाची आहे, हे ही तेव्हाच कळते.
वर्षातुन दोनदा ही अर्थिंग तपासायची सवय ठेवा ।
अर्थिंग तपासायला घरीच उपकरण तयार करू शकता. एक होल्डर, एक बल्ब (कुठला ही चालतो) आणि दोन वायर्स. होल्डर ला वायर्स जोड़ा. बल्ब लावा, झाले तुमचे उपकरण तयार. आता अर्थिंग तपासायला एक वायर जाड्या पिन च्या ठिकाणी लावा, दूसरी वायर आल्टरनेट बारीक पिन्स च्या भोकात घालून बघा. एका बारीक पिन वर वायर लावली कि बल्ब प्रकाशमान होईल, एकात प्रकाशमान नाही होणार. बल्ब लागला तर तुमच्या त्या बोर्ड पर्यन्त अर्थिंग वर्किंग कंडीशन मध्ये आहे. असे घराचा प्रत्येक बोर्ड तपासा.
समजा घरात कुठेच थ्री पिन मध्ये वरील प्रमाणे बल्ब प्रकाशमान होत नाही, तर तुमच्या घरातील अर्थिंग गड़बड़ आहे. ह्या परिस्थितीत घराचे अर्थिंग जिथे ही असेल , ते तपासा, सामान्यतया स्वतंत्र घरां मध्ये मीटर बोर्ड च्या जवळ पास च अर्थिंग केलेले असते. पुष्कळ शहाणे ह्या करिता वापरलेली अर्थिंग वायर, आँगणात किंवा भिंती च्या "प्लास्टर मध्ये दाबून टाकतात" कारण घराची सुंदरता कमी(???) होते. हा शहाणपणा मुळीच करू नयेत. कारण ही वायर लोखंडी असली तर गंजून गळते, इतर असेल तर केव्हा तुटली, कळणार ही नाही , म्हणून अर्थिंग वायर सतत मीटर बोर्ड पासून अर्थिंग पिट पर्यन्त दर्शनीय असली पाहिजे. तसेच अर्थिंग पिट मध्ये अर्थिंग साठी लावलेला पाइप ही दर्शनिय असलाच पाहिजे. अर्थ रेसिस्टेन्स कमी ठेवायला ह्या अर्थिंग पिट मध्ये ओलावा असलाच पाहिजे म्हणून रोज निदान एकदा जेवना नंतर इथे हाथ धुवायाची सवय ठेवा. ह्या निमित्याने रेगुलर अर्थिंग इंस्पेक्शन ची सवय लागेल, आणि काही गड़बड़ वाटली तर लगेच सुधरविता येईल.
विचार करा, आवडले तर व्यवहारात आणा. नसेल आवडले तर विसरा , पण कधी ही जीव ह्या हलगर्जी मुळे द्यायची तयारी ठेवा. वाईट वाटले असेल तरी दिलगीर मुळीच नाही, कारण "जान है, तो ही जहान है" ।मरज़ी तुमची, कारण जीव आहे तुमचा ।
आपण वेळ दिला वाचायला, म्हणून धन्यवाद ।
मिलिंद भिड़े,
भिलाई नगर, छत्तीसगढ़