शिरोली / प्रतिनिधी दि. ३/८/१८
अवधूत मुसळे
हातकणंगले तालूक्यातील हेरले ते मौजे वडगाव व मौजे वडगाव ते फाटा ह्या रस्त्यांची चाळण झाली असून रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता संशोधनाचा मुद्दा ठरत आहे. वारंवार अपघाताने प्रवास करणे दुरापास्त झाला आहे.
हेरले ते मौजे वडगाव दिड कि मी व मौजे वडगाव ते कोल्हापूर सांगली हायवेला जोडणारा मुख्य रस्त्या अडीच किमीचा आहे. या रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे पडल्याने प्रवास करणे जिकीरिचे बनले आहे.कोल्हापूरला जाण्यासाठी मौजे वडगावातून हेरलेमार्गे व फाटा हे सोयीचे मुख्य रस्ते असून त्या रस्त्यावर अनेक दिवसापासून आर्धा फुटाच्या मापाचे जागो जागी खोलवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना अंदाज येत नसल्यामुळे अनेक मोटर सायकल घसरून अपघात होऊ लागले आहेत.
तसेच खोलगट खड्ड्यामध्ये चारचाकी वाहणे समोरून दुसरे वाहन आल्यास आडकू लागल्यामुळे प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. कोल्हापूरला जाण्यासाठी हे मुख्य रस्ते असल्यामुळे शाळा ,महाविद्यालय ,दवाखाना, तसेच नोकर वर्ग या निमित्ताने गावातील शेकडो लोकांची नियमित ये जा असते. अशा ठिकाणच्या रस्त्याकडे दुर्लक्ष होणे म्हणजे आपघाताला निमंत्रण दिल्याप्रमाणेच आहे.तसेच गावात येणारी केएमटी बस खराब रस्त्यामुळे बंद होईल अशी भिती विद्यार्थी व पालकवर्गात आहे. त्यामुळे निदान तात्पूरता मुरुम टाकून तरी हे खड्डे मुजवावेत अशी मागणी ग्रामस्थ , वाहनधारक व प्रवाशी वर्गातून होत आहे .
फोटो कॅप्शन
मौजे वडगांव रस्त्यावर पडलेले मोठे खड्डेमुळे प्रवास करणे कठीण बनले आहे.