कोल्हापूर प्रतिनिधी दि. 04 अॉगस्ट 2018
केंद्रीय आरोग्य मंत्रालय डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन, फेंन्सेडिल आदींसह ३४३ औषधांवर बंदी घालण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार देशातल्या जवळपास तीनशेहून अधिक औषधांवर आरोग्य मंत्रालय बंदी घालण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय औषध बनवणाऱ्या कंपन्यांसोबतच देशी औषधी निर्माता कंपन्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो व औषध व्यापारावर मंदीचे सावट येऊ शकते.
वेदनाशामक आणि फ्लू शी संबंधित औषधांवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ही औषधे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधे आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
या निर्णयाला आव्हान देत बहुराष्ट्रीय कंपन्या न्यायालयात दाद मागु शकतात त्यांनी जर या निर्णयाला स्थगिती आदेश मिळवले तर तारीख पे तारिख होऊ शकते आणि ही औषधे बंदी बासनातच गुंडाळली जाऊ शकते.