हेरले / प्रतिनिधी दि. २८/८/१८
मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील श्री जय हनुमान सह दुध संस्थेची ११वी सर्वसाधा२ण सभा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत संपन्न झाली. संस्थेचे सचिव आण्णासो पाटील यांनी अहवाल वाचन केले तर सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन बाळासो आ .चौगुले होते .
यावेळी गोकूळ दुध संघाचे सुपरवायझर सुरेश पाटील यांची सिनियर सुपर वायजर म्हणून बढती झाल्याने संस्थेच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की , संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांचे चांगले नियोजन व चिकाटीमुळे अल्पावधीत शंभर लिटर पासून नऊशे लिटर पर्यत दुधसंकलना चा टप्पा पार केला असून भविष्यात १०००लिटर दुधसंकलनाचा टप्पा संस्था पार करेल. गाय दुधापेक्षा म्हैस दुधवाढीचा टक्का वाढला पाहीजे यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना देऊन जनावरांबाबत व दुधसंदर्भात उत्तम मार्गदर्शन केले.
सभेमध्ये मराठा आरक्षण , लिंगायत आरक्षण 'धनगर आरक्षण यांना पाठींबा जाहीर करण्यात आला. संस्थेच्या सर्व दुधउत्पादक सभासदांचा अपघात विमा संस्थेमार्फत मोफत उतरण्यात यावा असा ठरावही करण्यात आला. तसेच संस्थेस म्हैस व गाय दुधाचा जास्त पुरवठा करणाऱ्या सभासदांना उत्तेजन मिळावे म्हणून रोख रक्कम व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थापक चेअरमन बाळासो थोरवत व्हा . चेअरमन श्रीकृष्ण थोरवत, संचालक मंडळ महादेव शिंदे , नेताजी माने, सतिश चौगुले, जयवंत चौगुले, सुरेश कांबरे , निवास शेंडगे, सुनिल सुतार, ग्रा.पंसदस्य अवधूत मुसळे , शकील हजारी सुभाष मुसळे, प्रकाश पाटील , आदीसह दुधउत्पादक सभासद कर्मचारी संस्थेचे हितचिंतक मोठया प्रमाणात उपस्थित होते .प्रास्ताविक सचिव आणासो पाटील यांनी तर आभार संचालक महादेव चौगुले यांनी मानले .
फोटो
मौजे वडगाव येथील श्री हनुमान दुधसंस्थेच्या वतीने सिनीअर सुपरवायजर सुरेश पाटील यांचा सत्कार चेअरमन बाळासो चौगुले करतांना. शेजारी इतर मान्यवर.