माजगांव प्रतिनिधी:—दि.१/८/२०१८
जो आशय शंभर ते दोनशे शब्दात मांडता येणार नाही तोच आशय चार ओळीत कोंडण्याचा पराक्रम या जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी केला आहे.असे मत संत साहित्याचे अभ्यासक व निवृत्त उप. मु.कार्य अधिकारी मा.इंद्रजित देशमुख सो यांनी सांगीतले.ते कन्या विद्या मंदिर पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर या शाळेतील ई. ५वी. ते ई.७वीतील विद्यार्थिनिंनी लिहलेल्या "कोवळे उन"या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते
विद्यार्थ्यिनिंनी सावित्रीबाई फुले यांच्यावर लिहलेल्या कवितेचा दाखला देत सावित्रीबाईंनी मुलिंच्या शिक्षणासाठी अंगावर शेन झेलल्याचे सांगीतले.पर्यावरणावरील कविताही मनाला भिडणार्या आहेत.ही पिढी पर्यावरणाचा एवढा विचार करत असेल तर भविष्यात पर्यावरण प्रदुषण कमी व्हायला निश्चित मदत होईल.तसेच या कविता लिहनार्या चाळीस विद्यार्थिनी या उद्याच्या चाळीस कवयत्रीच असल्याचे गौरव उद्गार इंद्रजित देशमुख यांनी काढले.
यावेळी माजगांच्या उद्योन्मुख कवयत्री सौ.सुलोचना संजय पाटील यांनी आपला "संसार गाथा" हा काव्यसंग्रह इंद्रजित देशमुख यांना भेट म्हणुन देणेत आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच प्रकाश जाधव होते.कार्यक्रमाला गट शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत मॅडम,प्रकाशक युवराज कदम व वनिता कदम,वाचन कट्टाचे मुख्य समन्वयक टी के सरगर,केंद्रप्रमुख एम.डी.पाटील,संपादक विजय एकसींगे माजी जि.प. सदस्य प्रकाश पाटील अण्णा, कन्या.शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष रामराव चेचर,कुमार शाळेचे व्यवस्थापण समिती अध्यक्ष संभाजी खवरे,कन्या शाळेचे मुख्याध्यापक डी.एस. चौगले सर, कुमार शाळेचे मुख्याध्यापक सावंत सर,शाळा व्यवस्थापण समिती सर्व सदस्य,शाळेतील शिक्षक मांडवकर सर,जाधव सर,हिंदुराव काशिद सर,कुबेर चौगले सर,ठाणेकर सर,काटकर सर,हुपरे सर,भिमराव काशिद सर,शेवाळे सर,सर्जेराव गुरव सर,आसिफ पठाण सर, प्रकाश पोवार सर,नामदेव पोवार सर,बाजीराव कदम सर,कृष्णात कोरे सर उदाळे सर व ग्रामस्त उपस्थित होते.आभार मांडवकर सर यांनी मानले.