फोटो ः अनिल पाटील
कोगनोळी ः येथील राष्ट्रीय महामार्गावर अपघातात नुकसान झालेले ट्रक
-----------------------
कोगनोळी, ता. 19 ः येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर बिरदेव माळ फाटयाजवळ गुरूवार ता. 18 रोजी रात्री 9 सुमारास आयशर व ट्रक यांच्या अपघात झाला. यामध्ये दोन्ही गाडयाचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक महिती अशी की, एमएच 06 एक्यू 2976 हा ट्रक्टर वाहक ट्रक कोल्हापूर हून बेळगांवकडे जात होता. याच दरम्यान एमएच 11 सीएच 2637 हा आयशर कंपनीचा ट्रक मागून येत होता. येथील बिरदेव माळ फाटयाजवळ पुढील ट्रकचालकांने अचानक ब्रेक लावल्याने पाठिमागून येत आसलेल्या आयशरची जोराची धडक बसली यामध्ये कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
---------------------------------------------------------------