कोगनोळी ः येथील मराठा मंडळ सांस्कृतीक भवनात व्याख्यानमालेत बोलताना प्रा. आशपाक मकानदार
---------------------
कोगनोळी, ( अनिल पाटील) ता. 15 ः
भारत हा देश देव देवता, पशुपक्षी, धरणी मातेची पुजा करणारा देश आहे. पण पश्यात संस्कृतीने युवकांचे विचार बदलले आहेत. संस्कृतीचे रक्षण करणे गरजेचे आहे. व्यापारी पध्दतीने सण आणले आहे. 6500 कंपन्या परदेशी आहेत. नवीन सण निर्मीती व्यापार दृष्टीकोण ठेवून आणले जात आहेत असे विचार प्रा. आशपाक मकानदार(गडहिंग्लज) यांनी केले. त्या कोगनोळी(ता.निपाणी) येथे छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ सांस्कृतीक भवनात आयोजित व्याख्यान मालेत पाचवे पुष्प गुतंताना अव्हाने नव्या पिढीसमोरील विषयावर व्याख्यान देताना सांगीतले.
अध्यक्षस्थानी मराठा मंडळचे अध्यक्ष शामराव माने हे होते.
स्वागत व प्रास्ताविक के. डी. पाटील(सर) यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन केले.
प्रा. मकानदार पुढे म्हणाले, सध्या गणेश उत्सव साजरा केला जातो पण त्या मागील उद्देश धुळीस मिळाला आहे. सध्या मोबईलचे वेड अबालवृध्दाना लागले आहे. कोपर्या कोपर्याला एक टोळी दिसते ती मोबाईल मध्ये डोके घालून बसलेली आसते. समोर काय होतय यांचे भान देखीन नसते. सर्व गोष्टीमुळे मानसातली मानुसकी संपत चालली आहे असे शेवटी मकानदार यांनी सांगीतले.
यावेळी नरसिंह पाटील, प्रकाश गायकवाड, ग्राम पंचायत सदस्य सचिन खोत, बाळासाहेब पाटील, आर. डी. कागले, रामचंद्र कागले. विजय पाटील, केशव पाटील, तानाजी हळिज्वाळे, ग्राम पंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक, प्रकाश कदम, दिनेश पाटील, अनिल पाटील, रामचंद्र डोंगळे, शांतीनाथ उपाध्ये यांच्यासह विविध सेवा संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.