कोगनोळी ः येथील फाटयावर अपघातात रस्त्यावर पडलेला ऊस व नुकसान ग्रस्त वाहने
------------------------------
कोगनोळी, अनिल पाटील ता. 19 ः
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर कोगनोळी फाटयावर आयशर व ऊस वहातूक ट्रक्टर-ट्रॉली यांच्यात झालेल्या अपघात सहा जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार ता. 19 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक महिती अशी की, ल्रिंगनूर ता. कागल येथून वंदूर येथे गुराळासाठी ऊस वहातूक करणार नवीन ट्रॅक्टर (क्रमांक नाही) ऊस घेवून जात होता. कोगनोळी फाटयावर रस्ता ओलाडून जात आसताना याच दरम्यान निपाणी हून कोल्हापूर कडे भरधाव निघालेल्या आयशर ट्रक (एमएच 10 झेड 1717) ची धडक बसली. ऊस वहातूक करणार्या ट्रेलर पलटी झाली. या ऊस ट्रेलरवर बसलेले मजूंर फुलाबाई पोवार(वय-35), लता पोवार(वय-45), दादासो पोवार(वय-30), राहूल पोवार(वय-26), ज्योती पोवार(वय-11), सुनिता पोवार(वय-23) सर्व रहानार पाथार्डी ता. कमळ, जिल्हा. उस्मानाबाद अशी जखमी झालेल्याची नांवे आहेत त्यांना कोल्हापूर येथील रूग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी निपाणी ग्रामीणचे उपनिरिक्षक बी. एस. तळवार, कोगनोळी चेक पोस्टचे एएसआय एम. आर. हंची यांनी भेट देवून पहाणी केली.
अपघात ग्रस्त ट्रॉली रस्त्यावर पडली असल्याने काही काळ बंद होता. नंतर रात्री उशिरा रस्ता वहातुकीस खुला झाला.
------------------------------------------